Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या …

श्री स्वयंभू महेश – ज्या वेळेला देव दानवांचा वाद निर्माण झाला, त्यावेळेला समुद्रमंथन करण्याचे ठरवले. ते मंथन केल्यानंतर त्यातून १४ रत्ने निघाली. …

काहीतरी सांगा…©️

काहीतरी सांगा…©️

श्री संत नामदेव महाराज – ज्याने या सर्वस्व ब्रह्मांडाची रचना केली, आकाश, पृथ्वी, सर्वस्व सृष्टीची रचना केली, ते तत्व आमच्या सारख्या अज्ञानी सेवेकऱ्यांना म्हणतात, “काहीतरी सांगा.” पण मी काय सांगावे?

आज या अज्ञानी, अडाणी सेवेकऱ्याची कशी काय आठवण झाली? आज महान भाग्य म्हणजे, दर्शन मिळावे ही इच्छा आहे.

अनंत लाघवी तत्व, न धरता येणारे, न सापडणारे, अशांचे गुणवर्णन करणे, त्यांच्याविषयी भक्तीयुक्त प्रवचन सांगणे, म्हणजे त्यांच्या भक्ती विषयी मी काय सांगणार? माझ्या सद्गुरुं पेक्षा दैवत श्रेष्ठ नाही. हे आपल्या चरणांजवळ निवेदन करावे लागते.

हल्लीच्या परिस्थितीमध्ये भक्ती करण्याची सर्वांना आवड असते, त्यात एकच, कुणाला गुळाची चव, तर कुणाला साखरेची चव असते. कुणाला खमंग आवडते, तर कुणाला तिखटाची गोडी असते. कुणाला कशाची, तर कोणाला कशाची? अन् अशा तऱ्हेने आज मानव वाटचाल करीत आहे. ज्याला माहित आहे की हे पदार्थ कशापासून होतात, त्याने त्या निर्माण कर्त्यालाच पकडलेले असते. (पुढे सुरू…२) ©️

You cannot copy content of this page