Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तुम्ही पाहता, अनुभवता की इथे लाखो वर्षे तपश्चर्या करणारे ऋषीमुनी सानिध्यात येऊन जातात, सानिध्यात वावरण्याचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरुंचा सेवेकर्‍यावर विश्वास असतो, त्याची परिपूर्णता करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा …

सद्गुरु प्रणवांचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरु प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेकऱ्यांना आपल्या अमृततुल्य बोलांनी समजावून सांगतात. जर सद्गुरूंनी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल, तर …

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

…ओळखणारा पाहिजे ! ©️

…ओळखणारा पाहिजे ! ©️

श्री समर्थ मालिक – ‌ मी नाही आकाशी, मी नाही पाताळी ! इतकेच की भक्त त्या पात्रतेचा असेल तर ! निष्काम, परिपूर्ण, सत स्फटिकासारखी वर्तणूक असेल तर मी त्या भक्ताला दूर नाही. आकाशीपण नाही आणि पाताळीपण नाही, तर मला सानिध्यात पाहता येईल, असे काही भक्तांनी सुद्धा सांगितले आहे. मी कोठे नाही असे ठिकाण नाही. इतकेच आहे की ओळखणारा पाहिजे. याच्या पलीकडे काही नाही.

प्रकृती अंग अनेक तऱ्हेने असे नटलेले तत्व कोणते आहे अन् प्रकृतीचे अंत:र्यामी कोण आहे? अन् ते का आहे? अनंत तऱ्हेने प्रकृती नटविली ती मीच ना? त्या प्रकृतीच्या अंत:र्यामी मीच आहे ना? मग अनंत रूपाने प्रकृती का नटविली? याचे कारण एकच, अनेक वेळेला सांगितले आहे.

मानव दोन तऱ्हेचे आहेत. भक्तीची अंगे दोन आहेत. सत् आणि असत ! असत भक्तीने मानव हैवान बनतो, मग तो प्रकृतीच्या अंगाने गेला की नाही? प्रकृती अहंकारी आहे. ती मनाच्या आधीन गेल्याने घसरली आहे, म्हणून अनंत रूपाने ते नटलेले आहे. अशा मानवांकरिता ८३ लक्ष योनी नटविल्या आहेत. त्याची पूर्णत्वाने रग जिरल्यानंतर त्याला मानव योनीत टाकतात. इतर प्राणीमात्र मुकी बिचारी. कोणीही हाका. ©️

You cannot copy content of this page