Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरुंचा सेवेकर्‍यावर विश्वास असतो, त्याची परिपूर्णता करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा …

सद्गुरु प्रणवांचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरु प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेकऱ्यांना आपल्या अमृततुल्य बोलांनी समजावून सांगतात. जर सद्गुरूंनी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल, तर …

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

एकादशी याचा अर्थ कळणार नाही का?©️

एकादशी याचा अर्थ कळणार नाही का?©️

श्री विठ्ठल – मन गढूळ कां होते? मन गढूळ होते कारण हा संसार आहे ना ! एका भक्ताने म्हटलेले आहे, “दिल गया तो जाना दे | मत जाना दे शरीर || ना खेचेगा कमान | तो कहा से लगेगा तीर ||” त्याचे शेले मी विणले ते का? चोखोबा संगे ढोरे ओढली, जनाची लुगडी धुतली याची कारणे कोणती? मग आताच्या सेवेकऱ्यांची कामे करायला जड पडतील काय? संशय, कल्पना यामुळे त्यांना शंका येते. जोपर्यंत संशय, कल्पना रहित ते होत नाही, तोपर्यंत भक्तीत रममाण होणे शक्य नाही.

सद्गुरुनी अखंड ठेव दिली. सर्वस्व दिले? पण शंका आली ती का? तर मन गढूळ झाले. मग सद्गुरूंपेक्षा आणखी कोणी तत्व जगात आहे का? तर नाही. मन सद्गुरु चरणात निमग्न करण्याचा प्रयत्न करा. तदनंतर आकारी आणि निराकारी कळेल.

सद्गुरु चरणात निमग्न झाल्यानंतर मग एकादशी याचा अर्थ कळणार नाही का? दहा इंद्रिये मनाच्या ठिकाणी लय करणे अन् ते मन सद्गुरू चरणावर वाहिल्यानंतर मग अकरावे ठिकाण वेगळे का आहे का? हे सर्वस्व बहाल केल्यानंतर त्रिकुटी स्थिर होते. तिथून मन अकराव्यात लय होते हीच एकादशी, मग एकादशीचा अर्थ कळेल की नाही?

१० + १ = ११. त्या एकाचाच अंत घेणे. त्याच्यानंतर एकादशी म्हणजे १० + ० + १. शून्य म्हणजेच ओंकार ! सेवेकऱ्यांना आसनावरून गणित रूपाने सांगितले, कृतिमान होण्याचा प्रयत्न सेवेकर्‍यांनी करणे. १ म्हणजेच आकार ! तोच ॐ कार ! म्हणजे एकातच एक मिलन झाल्यानंतर मग सर्व एकच ! शेवटी तो ही एक लय होतो. मग राहतो तो निर्गुण निराकार !

अनंतानी अनंत तत्वे या पृथ्वी तलावर फेकली आहेत. त्यांच्याकडून ते कार्य करून घेतात. म्हणून प्रत्येक सेवेकऱ्याने आपले कर्तव्य काय? आपण कोण? कोणत्या ठिकाणी शरण आहोत? हे ओळखून कृतीमान होण्याचा प्रयत्न करणे. ©️

You cannot copy content of this page