श्री समर्थ मालिक – यश हे अवश्य आहे. पण कधी कधी सत् सेवेकऱ्याला असताचे चटके बसतात. त्याला असताचे चटके बसून बसून यश हे आपोआप निर्माण होते. मात्र त्याला हे कळत नाही कि हे यश कशापासून मिळाले. हर्ष युक्त झाला की त्याला वाटते हे मीच करतो. पण यश आल्यानंतरच त्याची हर्ष युक्त भावना असते. पण जोपर्यंत कर्तव्य होत नाही, तोपर्यंत तो नाराजच असतो.
तुम्ही सांगितलेल्या योजना मला मान्य आहेत. ती अमलांत आणायची आहे. पण इतकेच की, तिचा प्रकाश अजून पडलाच नाही. एकदम अघोरावर हात टाकायचा, तो विचार करूनच टाकावा लागतो. म्हणून वेळ लागतो.
कोकण आश्रमाचे कर्तव्य करून घेणार हे मला मान्य आहे. आता त्याचा योग फारसा लांब नाही. जवळच आहे. ही दोन तत्वे अमर आहेत. आहेत तीन, पण एक नाशिवंत आहे. जडत्व हे पाच तत्वांचे आहे. त्यामुळे हे पाच तत्वात मिलन करायला लागते. अमर दोन पदे आहेत, ती दिसणार नाहीत. ते अखंड तत्व अन ॐ कार बीज. या दोन्हीचा नाश कोणी केला आहे का? ©️
