Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तुम्ही पाहता, अनुभवता की इथे लाखो वर्षे तपश्चर्या करणारे ऋषीमुनी सानिध्यात येऊन जातात, सानिध्यात वावरण्याचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरुंचा सेवेकर्‍यावर विश्वास असतो, त्याची परिपूर्णता करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा …

सद्गुरु प्रणवांचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरु प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेकऱ्यांना आपल्या अमृततुल्य बोलांनी समजावून सांगतात. जर सद्गुरूंनी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल, तर …

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

अखंड भक्ती प्रेम ©️

अखंड भक्ती प्रेम ©️

श्री समर्थ मालिक – प्रेमसूत्र दोरी नेतो तिकडे जातो श्रीहरी ! कोणाला कशाचे प्रेम, तर कोणाला पैशाचे प्रेम. अशा अनेक प्रेमात श्रेष्ठ प्रेम कोणते? ते प्रेम निर्माण का होते? अन् कोण निर्माण करते? इतर मानवांना भक्तीयुक्त प्रेम, सतप्रेम का निर्माण होत नाही? तर पूर्व संचिताप्रमाणे एखाद्या मानवाला भक्ती प्रेम निर्माण झाल्याशिवाय तो भक्ती मार्गात येत नाही. तो योग येतो, तो त्याचे संचित आणते अन् थेंबे थेंबे तळे साचते. त्याचप्रमाणे बहुत सुकृताचे संचित असल्यामुळे, भक्तीचे प्रेम अतोनात निर्माण होते, करावे लागते. ते प्रेम ज्या तऱ्हेने चालते, त्या तऱ्हेने भगवंत त्याच्या पाठीमागे जातात. पूर्व संचित नसेल, तर भक्ती प्रेम निर्माण होईल काय?

दुसरी गोष्ट, प्रेम निर्माण कोण करते? त्याची निर्मिती कोठून असते? मागील कर्तव्याचे फळ त्याला द्यावे लागते. त्याप्रमाणे प्रेम निर्माण होते. त्याशिवाय भक्तीचा जिव्हाळा निर्माण होणार नाही. अशा तऱ्हेने मग तो दर्शनयुक्त होतो. मग त्याची ती गोडी सुटत नाही. मग इतर मार्गाने ज्योत जाऊ शकेल का? मग तीच प्रेम सूत्र दोरी ज्या ज्या तऱ्हेने वळते त्या त्या तऱ्हेने भक्त आणि भगवंत वळतात. मग भक्ताच्या वेगळा हरी अन् हरीच्या वेगळा भक्त आहे का? ज्या ठिकाणी भक्त त्या ठिकाणी सताचा वास असतो. ती गती सुटत नाही. तेव्हा त्या पात्रतेची ज्योत असल्याशिवाय प्रेम निर्माण होत नाही.

मानवाने स्वयं शक्तिने प्रेम केले आहे का? तर नाही. ते पूर्व घडणीप्रमाणे होत असते. ते प्रेम अखंड असते. हेच अखंड प्रेम आदी अंतापासून चालत आलेले आहे. आतापण तेच चालू आहे. सध्याच्या परिस्थितीत ताजा अनुभव. या दरबारात कितीतरी सेवेकरी आहेत, मग त्यांचे प्रेम सारखे आहे का? अखंड भक्तीचा जिव्हाळा हा सत् प्रेमामुळे निर्माण होत असतो. ज्याने जाणले, ओळखले त्याच्या निराळा मी आहे का? म्हणून जसे प्रेम त्याप्रमाणे देणगी, त्याप्रमाणे घडण घडत असते. ती अखंड देणगी देण्यात येते. पण सत प्रेमाचा जिव्हाळा असेल तरच ! म्हणून सूत्राची दोरी ज्या बाजूने, त्या बाजूने भगवंताला जावे लागते. कारण सत् प्रेम, सत् जिव्हाळा असतो, त्यांच्या पाठीमागे भगवंत असतो. त्यामुळे त्याला अडीअडचणी येत नाहीत. त्याचे कार्य सुलभ होत असते. (समाप्त)©️

You cannot copy content of this page