श्री समर्थ मालिक – परब्रम्ह तत्व आपल्या ठायीच सर्वभूतेषु भरलेले आहे अन् भरून सुद्धा अलिप्त आहे. त्याचा शोध घ्यावयाचा आहे. पण ॐ कार स्वरूप बनल्याशिवाय थांग लागणे कठीण आहे.
आकाराला पुजल्याशिवाय निराकाराची ओळख होणार नाही. जे आकारी आहेत, त्यालाच ॐ कार स्वरूप हे नामाभिधान आहे. याची वाढ कोणी करावयाची?
मानवी तऱ्हेने त्रास झाला तर आसना जवळ सांगता, पण कृतीमान असेल तर सांगण्याची आवश्यकता होईल का? म्हणूनच जे अखंड आहे, त्याची निर्मिती नाही, ते स्वयमेव आहे. ते धावत नाही, सापडत नाही, कोणी म्हणतात हवा आहे, कोणी म्हणतात गंध, पण शक्ती किती आहे याची गणना कोणी केली नाही.
हवा म्हणजेच प्रणव ! अन् हे ब्रह्म आकारी तसेच निराकारीही होऊ शकते. तो त्यांचा अधिकार आहे. पण सेवेकर्यांची पाहण्याची ताकद आहे का? जोपर्यंत सेवेकर्यांनी आसनाधिस्तांना ओळखले नाही, तोपर्यंत सेवेकरी असेच लुडबुड करणार ! आपण शुद्ध स्फटिकासारखे असल्यानंतर मग त्रास होईल का? हे सेवेकर्यांनी ओळखावे. (समाप्त)©️
