Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तुम्ही पाहता, अनुभवता की इथे लाखो वर्षे तपश्चर्या करणारे ऋषीमुनी सानिध्यात येऊन जातात, सानिध्यात वावरण्याचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरुंचा सेवेकर्‍यावर विश्वास असतो, त्याची परिपूर्णता करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा …

सद्गुरु प्रणवांचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरु प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेकऱ्यांना आपल्या अमृततुल्य बोलांनी समजावून सांगतात. जर सद्गुरूंनी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल, तर …

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

अद्वैत कशाला म्हणतात…©️

अद्वैत कशाला म्हणतात…©️

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तुम्ही पाहता, अनुभवता की इथे लाखो वर्षे तपश्चर्या करणारे ऋषीमुनी सानिध्यात येऊन जातात, सानिध्यात वावरण्याचा प्रयत्न करतात अशा तत्त्वाच्या सानिध्यात तुम्ही मानवी सेवेकरी आहात, मग तुम्ही भाग्यवान नाहीत का? कारण दृश्यांचे दर्शन तुम्ही घेता परंतु त्याच्यासाठी त्या अदृश्य ऋषीमुनींकरीता ही अत्यंत कठीण गोष्ट आहे. अशा तत्त्वाचे दर्शन घेण्यासाठी आपण पाहता की महान महान ऋषीमुनींची देखील झुंबड उडते. याला कारण त्यांना माहित आहे की ज्या तत्त्वाचे आपणाला स्थूल रूपी दर्शन घ्यायचे आहे अशांच्या ठिकाणीच लय होणे आवश्यक आहे. यालाच अद्वैत म्हणतात.

एकदा का सेवेकरी सतमय झाला, म्हणजे सत चरणात लय झाला, म्हणजेच तो अद्वैत झाला असे म्हणता येईल. म्हणजेच सत सेवेकरी हे वेगळे नातेच शिल्लक राहणार नाही, कारण सत आणि सेवेकरी हे एकमेकां वेगळे दाखवताच येणार नाहीत. यालाच अद्वैत म्हणतात. ©️

You cannot copy content of this page