Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा …

ब्रह्मर्षी पद काय आहे याची सेवेकऱ्यांनो तुम्हाला कल्पना नाही. साक्षात त्रिगुण देखील त्यांच्यापुढे वाकतात असे ते पद आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश अन …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे, “मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – काही काही सेवेकरी म्हणतात, ”बाबा, आम्हाला अजून प्रकाश नाही, प्रकाशाची गती मिळत नाही.” त्यावेळी सद्गुरू …

संत समागमे धरुनी आवडी…©️

संत समागमे धरुनी आवडी…©️

श्री समर्थ मालिक – संत समागमे धरुनी आवडी | करावी तातडी परमार्थाची ||

आत्ताच्या युगामध्ये संत मिळणे दुरापास्त आहे. ज्याला भक्तीचे मूळ पूर्णत्वाने सापडले तोच त्या ठिकाणी चिकटून राहिला. तो इकडे तिकडे भरकटत नाही. एकाच ठिकाणी बसून आपल्या तत्त्वाशी तद्रूप राहिल्यानंतर तो शांतच आहे. त्याला सर्वस्व सापडले आहे. त्याला कुठेही जाण्याची आवश्यकता नाही. तोच संत आहे.

या ठिकाणी काही लोक आहे त्यातील थोड्या जणांनाच ही खूण सापडली आहे. निष्काम वृत्तीने सेवेकरी कर्तव्याला झटत आहेत. जखडून आहेत ते सेवेकरी मात्र पूर्ण शांत असतात. त्यांना कळून चुकलेले असते. जे माहित नाही ते माहित झाल्यानंतर त्यांना कशाचीही अपेक्षा नसते.

या ठिकाणी स्पष्ट निवेदन केले आहे. जे गुप्त आहे, ते दाखविले आहे. पूर्वीच्या कर्म संचिताप्रमाणे काही सेवेकरी अडीअडचणीत असतात. म्हणून अवधी असतो. तरी त्याने मन मोकळेपणाने कर्तव्याची वाटचाल करावी. शंका रहित कल्पना रहित होऊनच वाटचाल करावी. जे केल्याने सद्गुरुंची प्राप्ती होते, सद्गुरु चरणांची प्राप्ती होते. ©️

You cannot copy content of this page