Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा …

ब्रह्मर्षी पद काय आहे याची सेवेकऱ्यांनो तुम्हाला कल्पना नाही. साक्षात त्रिगुण देखील त्यांच्यापुढे वाकतात असे ते पद आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश अन …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे, “मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – काही काही सेवेकरी म्हणतात, ”बाबा, आम्हाला अजून प्रकाश नाही, प्रकाशाची गती मिळत नाही.” त्यावेळी सद्गुरू …

तत्त्वच आत चुपचाप आहे…©️

तत्त्वच आत चुपचाप आहे…©️

श्री समर्थ मालिक – मर्यादा सांभाळली, पाळली पाहिजे. हे सत्य आहे. मर्यादा पाळल्यानंतर ती मर्यादा उपभोगात आणता येते. म्हणून पाळली पाहिजे. तत्त्वाला सुद्धा त्याचा दुरुपयोग करता येणार नाही. त्यांना ते कर्तव्य उद्या परवा केलेच पाहिजे. हा आदी अंतापासूनचा सिद्धांत आहे.

आधीच्या काळापेक्षा आत्ताचा काळ फार न्यारा आहे. त्यासाठी कर्तव्य लवकर व्हावे असे आपले म्हणणे आहे. त्यांचेही म्हणणे बरोबर आहे. रामावतारात १४ वर्षे वनवास काढला. त्यात, एक पण आहे. प्रत्यक्ष तत्वाने कार्य केल्यानंतर जी सहनशीलता अंगात उतरलेली असते…..

तत्त्वाच्या अंगात सहनशीलता असते. ती मानवांच्या अंगात नसते म्हणून मानवांची आणि तत्वांची शक्ती एक होऊ शकत नाही. म्हणून ज्या तत्त्वाने १४ वर्षे कष्ट भोगले, तसे कष्ट सेवेकऱ्याने भोगावे का? सेवेकर्‍याला आपल्या बरोबर धरायचे असेल, तर केव्हा अन कधी? तत्त्वाला जर आपल्या बरोबर धरायचे असेल, तर सहनशीलता वाढवून दिली पाहिजे. तत्त्वच प्रकृती नटवून आत चुपचाप आहे. मग त्यांनीच जर सहनशीलता वाढवून दिली तर १४ वर्षे सुद्धा स्वस्थ बसू.

You cannot copy content of this page