Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा …

ब्रह्मर्षी पद काय आहे याची सेवेकऱ्यांनो तुम्हाला कल्पना नाही. साक्षात त्रिगुण देखील त्यांच्यापुढे वाकतात असे ते पद आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश अन …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे, “मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – काही काही सेवेकरी म्हणतात, ”बाबा, आम्हाला अजून प्रकाश नाही, प्रकाशाची गती मिळत नाही.” त्यावेळी सद्गुरू …

ज्ञानाचा उपयोग झाला पाहिजे…©️

ज्ञानाचा उपयोग झाला पाहिजे…©️

श्री समर्थ मालिक – ज्ञान अनंत तऱ्हेने घेतले पाहिजे. त्याचा उपभोग घेतला पाहिजे. अनंत तऱ्हेने उपभोग घेतला पाहिजे. त्याप्रमाणे बुद्धी चालते.

दरबार मध्ये जी गती मिळाली, त्यामुळे अनेक सेवेकऱ्यांच्या भावना चलबिचल झाल्या असतील. पहिल्यांदा दोन ज्योती आल्या. नंतर तिसरी ज्योत आली. तदनंतर चौथी ज्योत आली. सेवेकर्‍यांनी ओळखले पाहिजे. त्याच्यासाठी सेवेकर्‍यांना ज्ञान, दिव्यदृष्टी व अनंत चक्षु पाहिजेत. त्याकरिताच त्यांना विचारले म्हणजे सद्गुरूंना विचारावे. म्हणजेच ज्ञान मिळत असते. इतर सेवेकऱ्यांच्या मनात शंका निर्माण झाली की या ठिकाणी अघोर ज्योती आहेत व त्यांनी थैमान घातले. याच्याबद्दल सेवेकऱ्यांना ज्ञान असावयास पाहिजे होते.

ज्ञान सद्गुरु कृपेने मिळते. ज्ञानाचा उपयोग म्हणजे ज्ञानदीप आहे, म्हणजेच ज्ञान आहे असे सिद्ध होते. ज्ञान आहे, त्या ज्ञानाचे कर्तव्य म्हणजे उपयोग झाला पाहिजे. त्याप्रमाणे सेवेकर्‍यांनी वाटचाल करावी. ©️

You cannot copy content of this page