Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री विठ्ठल – सद्गुरु चलाख नसतील तर….सद्गुरुंना भोळसट करणारे तत्त्व दुसरे कोणतेही नाही. चलाख बनविणारेही तत्व नाही. ते स्वयमेव तत्व असल्यामुळे ते …

श्री समर्थ मालिक – मालिक वैकुंठी नाहीत. योगीयांच्या हृदयी नाहीत, तर मग मी कोठे असतो? तर मी सत् भक्तांच्या ठिकाणी असतो. तेथेच …

तो जर सताला जखडून राहील…©️

तो जर सताला जखडून राहील…©️

श्री विठ्ठल – सद्गुरू साधे, सुलभ. कधीतरी लहरीत असल्यानंतर बोल फेकतात. ते मार्मिक बोल कसे आहेत हे सेवेकर्‍यांनी ओळखावे. सहज बोलणे असते. यात मर्म आहे. हाच उपदेश आहे. आज तो सेवेकर्‍यांनी घेण्याचा प्रयत्न करावा. सद्गुरु कृपेने स्वतःची खूण स्वतःच ओळखली नाही, तर तो मानव आहे हे सिद्ध होत नाही. मानवाने ज्याने हे ओळखले, त्यालाच ते सापडले, ज्याने ओळखले नाही, त्याला सत तरी कसा अंत देईल?

काही काहीजण मोठ मोठी प्रवचने सांगतात. त्याने जर ईश्वर पाहिला, तरच तो सांगतो की जगात परमेश्वर आहे. काही संतांनी कीर्तने केली, ती मानव सुधारण्यासाठीच केली. भक्तीचे वळण दाखविण्यासाठीच केली. आता पंढरीला पुष्कळ भक्त येतात व मंदिरात पुष्कळ गर्दी होते. कोणी बडव्यांच्या सोटक्यामुळे जवळ सुद्धा येत नाहीत. मग तो भक्त आहे असे म्हणावे का? बडव्यांना तरी कळले आहे का? पैशासाठी सारखी मारझोड चाललेली असते. जो भक्त आहे, त्याला काही सांगावे लागत नाही. तो जिथे बसेल, तेथेच तटस्थ राहील व विठ्ठल कोठे आहे हे पाहिल.

आम्हाला कोणीतरी अधिकार दिलेले आहेत. त्याप्रमाणेच आम्ही चालतो.

ज्या ठिकाणी बसाल, त्या ठिकाणीच मला पाहू शकाल. मी कोणत्या रूपात आहे, हे कोणी पाहिले आहे का? मी कोणत्या रूपात त्या ठिकाणी आहे? खांद्यावर घोंगडी, हातात काठी घेऊन आलो. नंतर मी बाल स्वरूपात आहे, हे कोणी पाहिले आहे का? मानव हा चुकीला पात्र आहे. पण तो जर सताला जखडून राहील तर त्याच्याकडून चुका होणार नाहीत. (समाप्त) ©️

You cannot copy content of this page