Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा …

ब्रह्मर्षी पद काय आहे याची सेवेकऱ्यांनो तुम्हाला कल्पना नाही. साक्षात त्रिगुण देखील त्यांच्यापुढे वाकतात असे ते पद आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश अन …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे, “मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – काही काही सेवेकरी म्हणतात, ”बाबा, आम्हाला अजून प्रकाश नाही, प्रकाशाची गती मिळत नाही.” त्यावेळी सद्गुरू …

सद्गुरु महिमा…©️

सद्गुरु महिमा…©️

श्री एकनाथ महाराज – सद्गुरूंचा महिमा सद्गुरु जाणे. सध्याच्या परिस्थितीत मात्र सद्गुरु महिमा सेवेकर्‍यांना कळणे कठीण आहे. सेवेकरी म्हणजे हा एक त्यांच्या चरणांचा कण आहे. मग सद्गुरु महिमेचा अंत त्याला सापडेल का? त्यांच्या लिलेचाच जर अंत सापडला नाही, तर त्यांचा अंत सापडणे दुरापास्त आहे. अनंत कोणी टोपी आहे ती ! मग त्यांच्या महिमेचा अंत लागेल का? तेव्हा सत भक्ताने, सत् सेवेकऱ्याने त्यांच्या महिमेचा, लिलेचा विषय घेण्याची जरुरी नाही, तर एकाच ठिकाणी, ज्यांना शरण आहात त्याच ठिकाणी संपूर्ण लीन झालात तर लिलेचाही अंत लागेल.

सद्गुरु कसे आहेत हे सुद्धा त्यांना पाहता येईल. मग मात्र, सद्गुरु चरण त्यांना कुठे मिळतील? कसे मिळतील? सद्गुरु चरण कोठे आहेत? कसे सापडणार? कोठे जावयास पाहिजे? पंढरीला का त्या हिमालयात जावयास पाहिजे? मग कोठे जावयास पाहिजे? तीन ताळ, सप्त पाताळ, २१ स्वर्ग जरी फिरलात तरी सद्गुरु चरण सापडतील का? मग कुठे सापडतील? याचे उत्तर एकच, ते आपल्या हृदयाच्या ठिकाणीच सापडतील हे सत्य आहे. मात्र सेवेकरी कृतिमान पाहिजे. सेवेकरी त्या तऱ्हेने कृतिमान झाला, मग मात्र हृदयातच सद्गुरु चरण आहेत ते समजेल.

हृदयातील सद्गुरु चरणात लीन होऊन दर्शन घेण्याचा प्रयत्न करा. अगाध महिमा त्याच ठिकाणी पहावयास मिळेल. जोपर्यंत स्वस्वरूपी लीन होत नाही, तोपर्यंत लिलेचे, महिमेचे वर्णन करता येणार नाही. एकच, चावी सापडली की, मग सर्वस्व वर्णन करता येईल. ©️

You cannot copy content of this page