Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या …

श्री स्वयंभू महेश – ज्या वेळेला देव दानवांचा वाद निर्माण झाला, त्यावेळेला समुद्रमंथन करण्याचे ठरवले. ते मंथन केल्यानंतर त्यातून १४ रत्ने निघाली. …

ठाम असाल तर ते कर्तव्य आपोआप होईल…©️

ठाम असाल तर ते कर्तव्य आपोआप होईल…©️

श्री समर्थ मालिक – अघोरांचे खच्चीकरण कसे होते याची कल्पना सेवेकऱ्यांना नाही. त्यांच्या दुष्कृत्यांची भरपाई झाल्यानंतर त्यांची कृती त्यांच्यावरच उलट झाल्यानंतर कार्य संपते. जो अघोर मानव गुळाने मरतो, त्याला विष पाजण्याची आवश्यकता असते काय? एवढेच कि थोडा अवधी लागतो. सत् भक्ताला थोडे कष्ट झाले तरी चालेल.

अघोराचे थैमान जिथपर्यंत चालायचे तिथपर्यंत चालू द्या. हे थैमान तात्पुरते असते. शेवटपर्यंत नाही. अनेक वेळेला सांगितले आहे की अघोर हे सर्वस्व खतम करता येत नाही, पण खतम होणार हे सत्य आहे. सत् असत हे दोन्ही असल्याशिवाय घर्षण होत नाही. वृक्षाला अनेक फांद्या असतात, पण त्या फांद्यांची एकमेकाला ओळख नसल्यामुळे त्यांचे घर्षण होत असते. पण बुंध्याने कधी म्हटले आहे का? हेच सेवेकऱ्याने लक्षात ठेवणे. म्हणून फांद्या फांद्यांचे जरी घर्षण झाले, नाना व्याप जरी झाले, तरी जो बुंधा आहे, तो मुळासकट उपटून पडत नाही. म्हणून बुंधा निर्माण करणारी शक्ती, हे सर्वस्व पहात आहे. काय होत आहे काय नाही यावर तिचे लक्ष आहे. इतकेच काय, याचा आपणास अनुभव मिळेल.

काळ अगदी नजीक आला आहे. सताचे कर्तव्य धीर गंभीर आणि शांत असते. त्या बुंध्याला मुळासकट उपटण्याचे सामर्थ्य त्या तत्वात असते. बुंध्याला नसते.

या चालू वर्षात पुढे काय होते ते पहा. पहावयास मिळेल. धीर सोडू नका. हल्लीच्या सेवेकर्‍यांना विशेष वाटते, ते कसे? प्रथम त्या ठिकाणी चमत्कार पहावयास मिळाले, आता ते होत नाहीत. पण सेवेकरी म्हणतात, काहीतरी करा. पण इतकेच सांगत आहे की, कर्तव्य होईल पण थोडा अवधी आहे. धीर धरा. माझ्या सताला, सद्गुरुंना आम्ही ज्या प्रकृतीला शरण आहोत, त्यांना त्रास होऊ नये ही इच्छा आहे. पण तुम्ही एकच, ठाम असाल तर ते कर्तव्य आपोआप होईल. चिंता नको. ©️

You cannot copy content of this page