Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा …

ब्रह्मर्षी पद काय आहे याची सेवेकऱ्यांनो तुम्हाला कल्पना नाही. साक्षात त्रिगुण देखील त्यांच्यापुढे वाकतात असे ते पद आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश अन …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे, “मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – काही काही सेवेकरी म्हणतात, ”बाबा, आम्हाला अजून प्रकाश नाही, प्रकाशाची गती मिळत नाही.” त्यावेळी सद्गुरू …

मनोभावना शुद्ध आहे का? ©️

मनोभावना शुद्ध आहे का? ©️

श्री समर्थ मालिक – या आसनाच्या सेवेकऱ्यांना अनेक वेळेला टोचणी दिलेली आहे. सर्व सेवेकऱ्यांची मनोभावना शुद्ध आहे का?

आसन आदीअंता पासून आहे. आसनाधिस्त आदीअंता पासून आहेत. काही गुप्त गोष्टी गुप्त असतात. सत् त्या गोष्टी गुप्त ठेवतात. अर्जुनाला देखील सांगितले होते, “सत् असताचा वादविवाद चाललेला आहे.” याच्यासाठी कोणत्याही सेवेकऱ्यांनी, “बस, गती घे ! मला सांग” असे सांगने योग्य आहे का? जरी सेवेकर्‍याला सांगितले, तरी सांगून काय उपयोग आहे? अजून शुद्ध व्हा ! शुद्ध गतीने जा ! मनाची शुद्धता ठेवा ! “बस, गती घे आणि काय आहे ते सांग” हे म्हणने योग्य नाही.

भक्ती जितकी साधी, तितकीच कठीण आहे. म्हणून सोप्या सुलभ मार्गाने जाण्याचा प्रयत्न करा. साधी सोपी म्हणजे सरळ शुद्ध मार्गाने गेलात तर कठीण नाही.

गुरुबंधूंचे नाते कोवळे का? गुलाबाचे फुल कोवळे नाजूक असते, तसे सेवेकर्‍यांनी आपले मन का ठेवू नये? सताला अतिशय त्रास झाला. सतावर असताने कुरघोडी केली म्हणजे अवतार कार्य घ्यावे लागते. तद्वतच आता काय चालले आहे, काय होत आहे याचा अनुभव सेवेकऱ्यांना मिळाला की नाही? म्हणून हे समजून आपण आपल्या कर्तव्यात निमग्न का होऊ नये? ©️

You cannot copy content of this page