Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा …

ब्रह्मर्षी पद काय आहे याची सेवेकऱ्यांनो तुम्हाला कल्पना नाही. साक्षात त्रिगुण देखील त्यांच्यापुढे वाकतात असे ते पद आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश अन …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे, “मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – काही काही सेवेकरी म्हणतात, ”बाबा, आम्हाला अजून प्रकाश नाही, प्रकाशाची गती मिळत नाही.” त्यावेळी सद्गुरू …

सत भक्ताला असताचा त्रास होतो ©️

सत भक्ताला असताचा त्रास होतो ©️

श्री समर्थ मालिक – आचार विचार सोडलेल्या मानवांसाठी पूर्ण विचार करावा लागतो. भरपाई झाल्याशिवाय हात घालता येत नाही. एकच, भक्तगणांनी धीर सोडू नये. आज कालचा हा काळ नाही. पूर्वीपासून हे चालत आलेले आहे. सत भक्ताला असताचा त्रास होतो. सेवेकरी त्यातून तापून कसून निघाल्यानंतर पूर्ण प्रकाशित होतो. पण त्याला कळत नाही. मातलेले अघोर त्या ठिकाणी शरण जातात.

घरातल्याला अनुभव देऊन सुद्धा त्याने काय धन लावली आहे? घरातल्या ज्योती मुळेच इतरांचा बडेजाव चालला आहे. त्याने जर त्यांच्यावर थोडासा जरी अंकुश ठेवला असता, तर त्या मानवांची टाप चालणार नाही. पण घरातल्याचे लक्ष आसनाच्या मिळकतीवर होते. ती लाटायचा विचार चालला होता. त्यावर संसार चालवायचा होता. पण अधिकारी तत्व ते चालू देणार नाही. प्रथमच मी संदेश दिले होते कि ही ज्योत दूर ठेवा, पण आपण म्हटले होते की, आपली ज्योत आहे. जेवण खानं मिळावयास पाहिजे. त्या ज्योतीला थोडेसे सानिध्य मिळाले आहे. दिलेले आहे. मायावीने या ज्योतीला पाहिले तर आप मतलबी ज्योत आहे. तो मतलब आपण साधू देत नाही. त्याला अनुभव दिला त्याची आठवण नाही. त्याला एखाद्या दिवशी चांगलीच आठवण देणार आहे. थोडक्या दिवसातच आठवण मिळेल. काळ अगदी नजीक आला आहे.

मी करूनही अकर्ता असलो तरी त्यात अनेक विचार आहेत. याच्यासाठी अनेक सात्विकांना झळ लागणार आहे. म्हणून विचार पडतो. इतकेच काय, खाण्यापिण्याची मोताद झाल्यावर हा काय करणार आहे? त्याच्यासाठी विचार पडतो. जे घडवायचे ते घडवून घेणारच आहे. सत हे तरुन निघणार. त्याच्यासाठी काहीतरी करावे लागते. आत्ताच संदेश दिले, झळ लागेल. ती सहन करा. वेळेच्या अभावी कोणावरही दया करता येणार नाही. मग कोणीही असो, सत् हे आपोआप तरुन निघणार. आपण काही चिंता करू नये. ©️

You cannot copy content of this page