Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या …

श्री स्वयंभू महेश – ज्या वेळेला देव दानवांचा वाद निर्माण झाला, त्यावेळेला समुद्रमंथन करण्याचे ठरवले. ते मंथन केल्यानंतर त्यातून १४ रत्ने निघाली. …

मी सुद्धा भोगत्वातून सुटलेलो नाही ©️

मी सुद्धा भोगत्वातून सुटलेलो नाही ©️

श्री समर्थ मालिक – आज कोकण आसनाला मानवी त्रास आहे हे मी जाणतो. हे मानव नसून अघोर राक्षस आहेत. त्यांना सताची परब्रम्हाची ओळख नाही, मग त्यांना काय कळणार? म्हणून सत मानवांना त्रास होत आहे. त्या ज्योती पूर्णत्व अहंकाराने बरबटलेल्या आहेत. हा अहंकार सतावर तात्पुरता मात करीत आहे. ही सर्वस्व घटना परब्रम्ह तत्व पहात आहे. ते मानवाच्या तत्त्वावर अवलंबून आहेत, ते तत्व त्यांना सावरीत आहे म्हणून ते तत्व अधांतरी आहे. त्या तत्त्वाला कोण सोडवते ते पाहू?

कोकण आश्रमाबद्दल नाराजी पत्करण्याची आवश्यकता नाही. कर्तव्य होणार हे निश्चित ! थोडा वेळ आहे. वेळ अगदी समीप आला आहे. तदनंतर मानवांचे काय करायचे ते परब्रह्म जाणते अन् मी पण जाणतो. सेवेकऱ्यांना संदेश आहेत की बोलाने घाव बसत नाही. सहनशीलता ठेवा. हे बोलाचे प्रायश्चित्त, जो बोलतो त्याला भोगावे लागेल. हे क्रमप्राप्त आहे. मात्र सेवेकऱ्यांना स्पर्श करण्याचे सामर्थ्य त्या मानवांजवळ नाही. स्पर्श केला तर काय होईल, हे निवेदन मी करीत नाही. स्पर्श केला तर त्या ठिकाणी हाहा:कार होईल. ज्योत ही चंचल आणि उर्मट असते म्हणून बोलणे सोपे पण कृती करणे कठीण आहे. सेवेकर्‍याला कोणीही स्पर्श करणार नाही. मात्र त्यांनी शांत राहावे. कर्तव्य होत आहे. थोड्या दिवसांनी दिसेल. सर्वांना निर्माण करणारे जे तत्व आहे, त्याने डोळे झाक करू नये अन् म्हणूनच त्यांना मी सेवेकरी या नात्याने संदेश देऊ शकतो. झाले ते ठीक झाले मी मानतो. असे जर असेल तर पापाचे घडे लवकर भरून घेण्याचा प्रयत्न करणे. लाघवी शक्ती आहे. एका क्षणात सुद्धा घडे भरून येतात. हे त्यांनी करावे ही विनंती आहे.

आपणाला अनेक वेळेला निवेदन करण्यात आले आहे की मी सुद्धा भोगत्वातून सुटलेलो नाही. मोकळा झाला मग तत्वाने जखडून घेतले तर त्याचे काहीही होणार नाही. पण तत्त्वामुळे होणे फार कठीण आहे. त्याच्यासाठी अनेक जन्म घ्यावे लागतात. त्यांनी समजावून घेतल्यावर परत जन्म नाही. म्हणून शांत राहणे. वेळ काळ जवळ आला आहे. अधेमधेच जर काळ पलटी झाला तर सांगता येत नाही. ©️

You cannot copy content of this page