Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा …

ब्रह्मर्षी पद काय आहे याची सेवेकऱ्यांनो तुम्हाला कल्पना नाही. साक्षात त्रिगुण देखील त्यांच्यापुढे वाकतात असे ते पद आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश अन …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे, “मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – काही काही सेवेकरी म्हणतात, ”बाबा, आम्हाला अजून प्रकाश नाही, प्रकाशाची गती मिळत नाही.” त्यावेळी सद्गुरू …

कर्तुम् अकर्तुम् शक्ती ©️

कर्तुम् अकर्तुम् शक्ती ©️

श्री नर्मदा निवासी मालिक – कर्तुम् अकर्तुम् जी शक्ती आहे, त्यांच्या भक्तांना व्याप होतात. त्याची पाहणी करणे कर्तव्य आहे. आकाराला चेतना देऊन निराकारी पदाने व्यवहार करणारी ती शक्ती लाघवाने खेळ खेळते.

कृष्णावतार त्यांनी नटविला हे मला मान्य आहे. त्यावेळी पार्थाला सांगितले, “मी पाप पुण्या निराळा ! सुख दुःखा वेगळा ! मज दंड कोण करी?” असे जे म्हटले होते ते कृष्ण म्हणत नव्हता.

कृष्ण हे ॐकार स्वरूप आकारी होते, पण आकार बोलत होता तो कशाच्या आधारावर? तो आकार कृष्ण समान झाला होता म्हणून प्रणव बाहेर पडत होते. करणारे तेच आणि निवारण करणारेही तेच आहेत. लाघवी तऱ्हेने खेळ खेळणारेही तेच आहेत. कोणत्या भक्ताला मोकळे सोडले आहे? चुकूनही नाही.

रामावतारात १४ वर्षे वनवास काढण्याची काय आवश्यकता होती? कृष्णावतारात ज्याप्रमाणे मानवी बुद्धी फिरत होती, त्याप्रमाणे वळसा घालून हे कर्तव्य करावे लागले. सतासाठी उलटे सुलटे करावे लागले. मानव कृष्णावताराला चांगले म्हणतात ते का? ज्यावेळी वाली सुग्रीव यांचे युद्ध झाले, त्या वेळेला सुग्रीवाला मारण्याची आवश्यकता काय होती? पण त्यामध्ये मुख्य मुद्दा काय आहे हे मानव बघत नाहीत. ते घेत नाहीत. ©️

You cannot copy content of this page