Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा …

ब्रह्मर्षी पद काय आहे याची सेवेकऱ्यांनो तुम्हाला कल्पना नाही. साक्षात त्रिगुण देखील त्यांच्यापुढे वाकतात असे ते पद आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश अन …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे, “मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – काही काही सेवेकरी म्हणतात, ”बाबा, आम्हाला अजून प्रकाश नाही, प्रकाशाची गती मिळत नाही.” त्यावेळी सद्गुरू …

कर्तव्यात राहणे हे संदेश आहेत ©️

कर्तव्यात राहणे हे संदेश आहेत ©️

प्रत्येक सेवेकऱ्याने आपल्या कर्तव्यात राहणे हे संदेश आहेत. त्याच्या पूर्व संचिताप्रमाणे जे लागेबांधे आहेत ते श्रेष्ठ आहत. हे नाते (सद्गुरु आणि सेवेकरी) अखंड आहे. अखंड पद आहे. ८४ लक्ष योनीत जरी सेवेकरी भटकला तरी सद्गुरु पदाचा ठाव घेण्यासाठी त्याला पुन्हा मानव जन्मात पाठवितात. तेव्हा सद्गुरूंच्या मुखातून मिळालेले अमृततुल्य प्रणव जतन करणे हे सेवेकऱ्यांचे महान पवित्र कर्तव्य आहे.

कालांतरापासून सेवेकरी आणि सदगुरू, गुरु आणि शिष्य हे नाते फार श्रेष्ठ आहे, अखंड आहे. आपल्या सेवेकऱ्याला शुद्धीवर आणण्यासाठी ते लाघव करतील, नाना तऱ्हा करतील, वेळेला शिक्षाही करतील. पण ते दूर फेकणार नाहीत हे सेवेकर्‍यांनी ध्यानात ठेवावे.

हे आसन बघितले तर काही दिसणार नाही. प्रकाशमान सेवेकऱ्यांनी चाचपून बघावे. कोणत्या तर्‍हेचे हे आसन आहे? याची पूर्णत्वाने छाननी करावी. अनेक वेळेला ऐकले ते सेवेकऱ्यांच्या हृदयी बिंबले पाहिजे. पूर्णत्वाने समजले पाहिजे. तरच त्याला महत्त्व आहे.

मानवांना, सेवेकऱ्यांना सत् पदाची गती जरी आहे, तरी त्यांची इच्छा होते. मालिक प्रत्येक वेळेला संदेश देतात. वर्ष येते आणि जाते, पण त्याला अंत नाही. जो संदेश दिला, त्यात मागे पुढे होणार नाही. असत होणार नाही. पण काही काळ, अन्यत्र कारणांमुळे मागे पुढे होत असते. कारण जगाची रचना निराळी आहे. कालचक्र हे सारखे फिरत असते. देवाण-घेवाणही चालू असते. तरीपण कालचक्र हे थोड्या कारणाने मागे-पुढे होते. जे घडणार आहे ते घडणारच ! याबाबतीत थोड्याच अवधीत आपणाला संदेश मिळतील. आपल्या मानवी तत्वाप्रमाणे हे ६वे, ७वे वर्ष आहे. पण कालचक्र हे फार निराळे आहे. ©️

You cannot copy content of this page