Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या …

श्री स्वयंभू महेश – ज्या वेळेला देव दानवांचा वाद निर्माण झाला, त्यावेळेला समुद्रमंथन करण्याचे ठरवले. ते मंथन केल्यानंतर त्यातून १४ रत्ने निघाली. …

अवतार कार्याचे निरुपण….©️

अवतार कार्याचे निरुपण….©️

ज्या वेळेला मानवांची गती विचित्र होते त्यावेळी अवतार कार्य नटवावे लागते. मानव प्रथम शुद्ध असतो, परंतु अनेक विचित्र गतीची त्याला पुटे चढत असतात, त्या वेळेला सताला तो विसरतो. मानव हा विचित्र गतीने जाणार ही सताला चिंता असते. त्याचवेळी अवतार कार्य नटवावे लागते व ती स्थित्यंतरे साफ करावी लागतात.

आता हे अवतार कार्यच चालू आहे. शुभदिनी आपणास संदेश दिले आहेत. जे कर्तव्य राहिले आहे ते महान पदाचे आहे. त्या कर्तव्याचा शेवट झाल्यानंतर, अशा तऱ्हेचे प्रवेश युक्त वातावरण नाही. महान कर्तव्याचा १० वा टप्पा संपल्यानंतर प्रवेश युक्त गती नाही.

आतापर्यंत आकाशवाणीने संदेश मिळत असत, पण आताचे कर्तव्य महान पदाचे आहे. ५००० वर्षा पाठीमागचा हा काळ आहे. त्या शापाने ही महाराष्ट्र भूमी दग्ध झाली आहे. त्या शापातून या भूमीच्या मुक्ततेसाठी अहोरात्र हे आसन झगडत आहे. अनेक महान महान कर्तव्ये या आसनाने पार पाडली आहेत. आता हे महान पदाचे कर्तव्य आहे. तोच हा १० वा टप्पा महान पदाचा आहे. त्याच्या कर्तव्याचा आढावा नंतर देण्यात येईल. या महान पदाच्या कर्तव्याचा आढावा पूर्णत्वाने घेतल्यानंतर, मग कर्तव्याची गती कोणती? ही गती दिल्यानंतर हे प्रवेशयुक्त कर्तव्य स्थिर करावयाचे संदेश आहेत. आपणाला कर्तव्य करीत रहा हे संदेश आहेत. कर्तव्याची गती संपल्यानंतर, अवतार कार्य समाप्त होते.

१० व्या टप्प्याचा आढावा पूर्णत्वाने देण्यात येईल. तो झाल्यानंतरचे जे कर्तव्य आहे ते या महान पदाचे ज्योतीला सांभाळून करावयाचे आहे. अघोरांचे गतीने कर्तव्य करावयाचे नाही. त्या महान ज्योतीचे निवेदन घेऊन, त्याला संरक्षण द्यावयाचे आहे. हे कर्तव्य झाल्यानंतर मानवाची मानवता सिद्ध करण्याचे कर्तव्य चालू राहणार आहे.

प्रवेशयुक्त गती नाही पण संदेश मिळत रहातील. आपणाला पूर्णत्वाने अधिकार आहेत. आपणाला संदेश घेण्याबद्दल जे बहाल केले आहे, ते कोणीही हिरावून घेणार नाही. जडत्वाचे म्हणजे स्थूलाचे अधिकार देण्याची वेळ आली आहे. दिलेले आहेतच पण ते सुप्तावस्थेत आहेत. स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण सर्वस्व अधिकार आहेत. सताला जाणण्यासाठी, सताला अबाधित ठेवण्यासाठी हे अवतार कार्य नटवले आहे. महाराष्ट्राचे कर्तव्य होतच रहाणार आहे. संवेदना स्वरूपात संदेश मिळतील. अणू, रेणू, परमाणुत सर्वस्व भरलेले आहे. त्याला जवळीकता आहे. ©️

You cannot copy content of this page