Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – मालिक वैकुंठी नाहीत. योगीयांच्या हृदयी नाहीत, तर मग मी कोठे असतो? तर मी सत् भक्तांच्या ठिकाणी असतो. तेथेच …

श्री गुरु पौर्णिमा-अलक©️

श्री गुरु पौर्णिमा-अलक©️

श्री अलक एकचित्त – सेवेकरी अन् सद्गुरु हे नाते निराळे आहे. सेवेकरी वेगळा नाही. म्हणून सेवेकऱ्यांनो, बंधुभाव, प्रेम निर्माण झाले पाहिजे. सद्गुरूंनी दिलेला उपदेश ध्यानी बाळगून आचरणात आणणे, ठेवणे. समता म्हणजे सेवेकरी सद्गुरु तादात्म्य होणे. ही समता सेवेकऱ्यात पाहिजे, बंधुभाव पाहिजे. कोणत्याही तऱ्हेचे किल्मिष असता कामा नये. एक सेवेकरी एक सद्गुरु एवढे तादात्म्य व्हावयास पाहिजे.

आजची ही सेवा तन-मन-धनाने, स्वयं भावनेने अर्पण करावयाची हाच गुरुकुलाचा महिमा आहे. सेवेकऱ्यांची पूजा म्हणजेच सद्गुरूंची पूजा! सद्गुरु निराळे नाहीत. ते तादात्म्य झालेले असतात. ते कधीही कोणाला सुटणार नाही. जी ज्ञानरूपी गंगा पाजली तिचे थोडे तरी चीज व्हावे. त्याचे श्रेष्ठत्व म्हणून व्यासपूजा. यावेळी सद्गुरु अन सेवेकरी एकमय होतात. सेवेकऱ्याप्रमाणे सद्गुरु ही तादात्म्य होतात. गुरु आपल्या शिष्याला ज्ञान देतो, एकरूप होतो. त्याची आठवण करून देणे. हाच गुरुपौर्णिमेचा महिमा आहे. या शुभ दिनापासून बंधूमय भावनेने, प्रेममय भावनेने वागणे हेच शुभ दिनी संदेश देत आहे.©️

You cannot copy content of this page