Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा …

ब्रह्मर्षी पद काय आहे याची सेवेकऱ्यांनो तुम्हाला कल्पना नाही. साक्षात त्रिगुण देखील त्यांच्यापुढे वाकतात असे ते पद आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश अन …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे, “मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

मनातील तरंग दूर करा ©️

मनातील तरंग दूर करा ©️

श्री समर्थ मालिक – मी नाही असा रिकामा ठाव नाही. संतांनी वर्णन केलेले आहे की, भगवंता शिवाय वृक्षाचे पानही हलत नाही. पवन सुटत नाही. पर्जन्य पडत नाही. सर्वस्व माझ्या सत्तेने होते. असे जर आहे, तर सेवेकर्‍यांनी आपल्या हृदयात याची खूणगाठ का बांधू नये? मी तू रहित का होऊ नये? मी तू रहित झाल्यानंतर सर्वांचे मन एकत्र होईल की नाही?

प्रकृतीच्या अंगाने सेवेकरी पाहतो – तो लहान, तो मोठा ! पण यात लहान आणि मोठे काही नाही. हे ज्याच्या त्याच्या कर्मसंचिताप्रमाणे असते. काहींना वाटत असते, मी निराळा आहे. पण सर्व घरी, सर्वांठायी जर मी आहे, तर मी निराळा कशावरून?

म्हणूनच आपल्या सेवेकर्‍यांनी मी कोणाचा सेवेकरी आहे हे ओळखावे. सर्व सेवेकरी एकाच तत्त्वाचे आहेत. ते माझे कोण आहेत? माझे जन्मदाते सर्व ठिकाणी विखुरले आहेत, याची गती सर्व सेवेकऱ्यांना सापडली असेलच. असे जर आहे, तर त्या ठिकाणी शांत कृतीने मनाला आळा का घालू शकत नाहीत? तरंग का दूर करू शकत नाहीत? तर हा विसरभोळेपणा नाही का? ©️

You cannot copy content of this page