Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तुम्ही पाहता, अनुभवता की इथे लाखो वर्षे तपश्चर्या करणारे ऋषीमुनी सानिध्यात येऊन जातात, सानिध्यात वावरण्याचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरुंचा सेवेकर्‍यावर विश्वास असतो, त्याची परिपूर्णता करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा …

सद्गुरु प्रणवांचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरु प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेकऱ्यांना आपल्या अमृततुल्य बोलांनी समजावून सांगतात. जर सद्गुरूंनी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल, तर …

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

निराकारी कोण? आकारी कोण? ©️

निराकारी कोण? आकारी कोण? ©️

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही.

निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. या दरबारातील सेवेकरी अप्रकाशित नाहीत. अप्रकाशित म्हणावे तर ते बसल्यानंतर रममाण होतातच ! म्हणून अप्रकाशित म्हणता येणार नाहीत. पण जी गती पाहिजे, ती अजून मिळालेली नाही.

कांही सेवेकर्‍यांनी पाठीमागे विचारले होते की, आसनाला स्थूल अधिकार कां नसावेत? असे प्रणव निघालेले आहेत. हे आत्ताच कळणार नाही. वेळ आल्यानंतर आपोआप कळेल. दिसण्यात येईल. स्थूल अधिकार नाहीत म्हणावेत तर रंजल्या गांजलेल्यांची कार्ये किती झाली आहेत? स्थूल मानवावर कर्तव्य करून त्यांना मुक्त केलेले आहे की नाही? रामावतारात स्थूलावर कर्तव्य होत होते. कृष्णावतारात अचेतनाला चेतनामय करून कर्तव्य करून घेतले.

आता सूक्ष्माचे कर्तव्य करून घेत आहे. या सूक्ष्मा वरून स्थूलावरचे कर्तव्य आपोआपच होणार आहे. हल्ली काय होत आहे, ते सर्वस्व कळत आहे. म्हणून जे होत आहे ते पहात रहा. तुकारामांच्या बोलावरून आपण शरण गेलात की नाही, याचे विवेचन आपणच करा. (समाप्त) ©️

You cannot copy content of this page