Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तुम्ही पाहता, अनुभवता की इथे लाखो वर्षे तपश्चर्या करणारे ऋषीमुनी सानिध्यात येऊन जातात, सानिध्यात वावरण्याचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरुंचा सेवेकर्‍यावर विश्वास असतो, त्याची परिपूर्णता करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा …

सद्गुरु प्रणवांचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरु प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेकऱ्यांना आपल्या अमृततुल्य बोलांनी समजावून सांगतात. जर सद्गुरूंनी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल, तर …

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

जो शांत, तोची संत | ©️

जो शांत, तोची संत | ©️

संत समागमे धरुनी आवडी | करावी तातडी परमार्थाची ||

श्री समर्थ मालिक – आत्ताच्या युगामध्ये संत मिळणे दुरापास्त आहे. ज्याला भक्तीचे मूळ पूर्णत्वाने सापडले तोच त्या ठिकाणी चिकटून राहिला. तो इकडे तिकडे भरकटत नाही. एकाच ठिकाणी बसून आपल्या तत्त्वाशी तद्रूप राहिल्यानंतर तो शांतच आहे. त्याला सर्वस्व सापडले आहे. त्याला कुठेही जाण्याची आवश्यकता नाही. तोच संत आहे.

या ठिकाणी काहीजण आहेत, त्यातील थोड्याच जणांना त्याची खूण सापडली आहे. निष्काम वृत्तीने सेवेकरी कर्तव्याला झटत आहे, जखडून आहे, तो मात्र पूर्ण शांत असतो. त्याला कळून चुकलेले असते. जे माहित नाही ते माहित झाल्यानंतर त्याला कशाचीही अपेक्षा नसते.

या ठिकाणी स्पष्ट निवेदन केले आहे. जे गुप्त आहे, ते दाखविले आहे. पूर्वीच्या कर्म संचिताप्रमाणे काही सेवेकरी अडीअडचणीत असतात. म्हणून अवधी असतो. तरी त्याने मन मोकळेपणाने कर्तव्याची वाटचाल करावी. शंका रहित कल्पना रहित होऊनच वाटचाल करावी. (समाप्त) ©️

You cannot copy content of this page