Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तुम्ही पाहता, अनुभवता की इथे लाखो वर्षे तपश्चर्या करणारे ऋषीमुनी सानिध्यात येऊन जातात, सानिध्यात वावरण्याचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरुंचा सेवेकर्‍यावर विश्वास असतो, त्याची परिपूर्णता करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा …

सद्गुरु प्रणवांचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरु प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेकऱ्यांना आपल्या अमृततुल्य बोलांनी समजावून सांगतात. जर सद्गुरूंनी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल, तर …

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

महाशिवरात्र – २ ©️

महाशिवरात्र – २ ©️

श्री कैलासपती स्वयंभू – जो शिव, त्याच्या ध्यानात सेवेकरी तल्लीन झाला म्हणजे मग रात्र काय आणि दिवस काय हे ध्यानात येत नाही. हिच ती शिवरात्र ! असे जे तत्व तेच सत्!

हे घडते कसे? तोच उपदेश अंबेला दिला कसा? ज्या वेळेला देव दानवांचा वाद निर्माण झाला, त्यावेळेला समुद्रमंथन करण्याचे ठरवले. ते मंथन केल्यानंतर त्यातून १४ रत्ने निघाली. त्यातच विष नावाचे रत्न निर्माण झाले. चांगली चांगली रत्ने दुसऱ्यांनी घेतली, पण कोणीही विष घ्यावयास तयार होईनात. मग ते टाकावयाचे कुठे? ते विष नामक रत्न आम्ही प्राशन केले. ते घेतल्याबरोबर सर्व देहाची आग झाली. स्थिरता नाही, शांती नाही. कोण म्हणे, वासूकी सर्प गळ्यात बांधा, चंद्र मस्तकी धारण करा, गंगा बोलवा, तिला धारण करा. सांगितल्याप्रमाणे सर्व केले, पण शांती मिळाली नाही.

तदनंतर समर्थ माऊलीने येऊन सांगितले की अरे, हे तू (नाम) जप म्हणजे तुला शांती मिळेल अन् तेव्हापासून मी त्याच ध्यानात आहे.

आज उपदेश आदी मायेला सांगितला आहे. जे स्वयमेव तत्व त्याचीच ही शिवरात्र ! हरकत नाही, पण अज्ञानाला हे सापडत नाही, म्हणून मानव भटकत आहे. ©️

You cannot copy content of this page