Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तुम्ही पाहता, अनुभवता की इथे लाखो वर्षे तपश्चर्या करणारे ऋषीमुनी सानिध्यात येऊन जातात, सानिध्यात वावरण्याचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरुंचा सेवेकर्‍यावर विश्वास असतो, त्याची परिपूर्णता करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा …

सद्गुरु प्रणवांचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरु प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेकऱ्यांना आपल्या अमृततुल्य बोलांनी समजावून सांगतात. जर सद्गुरूंनी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल, तर …

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

जो माझ्यात रममाण होतो…©️

जो माझ्यात रममाण होतो…©️

श्री समर्थ मालिक – सेवेकरी असून कर्तव्याची दिशा चुकला गेला तर आसनाने आसनाधिस्तांनी त्याच्यासाठी वशिला लावू नये. जो सात्विक असतो, तो रस्ता चुकत नाही, पण तो मनाचे आधीन झाल्यानंतर तोच रस्ता चुकतो, तेव्हा त्याला मार्गावर आणण्या करीता चुणूक दाखवावी लागते.

या २०-२५ वर्षाचे काळात चमत्कार, नमस्कार कितीतरी दाखविले आहेत. ज्यांनी हे चमत्कार पाहिले, त्यापैकी किती ज्योती या ठिकाणी रममाण झाल्यात? तर काही ठराविकच ! हे जरी खरे असले तरी पण रममाण कोणाला करून घ्यावयाचे आणि कोणाला नाही हे मला माहीत आहे.अन् हीच स्थिती येथे झालेली आहे.

येथील काही मानव मतलब साधण्यासाठीच सेवेकरी झालेले आहेत. काही ज्योती सोडल्यास बाकी ज्योती जागृत आहेत का? ज्या कर्तव्यासाठी संदेश सोडले, त्या कर्तव्याचे पालन झाले आहे का?

या सबंध वालावल भूमीमध्ये ज्यांनी आसनाची विटंबना केली, त्यांना त्याचे प्रायश्चित्त भोगायला लावी़नच लावीन. पण केव्हा आणि कधी? आसनाचे खोटे नाटे, इकडचे तिकडे कोण करीत आहे हे पण मला माहित आहे. त्यांना नाचायला लावीन.

काही सेवेकरी असे आहेत की ते अति प्रेम दाखवितात. त्यासाठी दाढी कुरवाळतात. तरी वरुन सेवेकर्‍यांनी दाढी धरावयाची व खाली पायाने तुडवावयाचे, मग दर्शन घेण्याचा अर्थ काय? तर हे कशासाठी करतात? मतलब साधण्यासाठी? पण तो मतलब साधू देणार नाही. या मानवानां त्राही त्राही करून सोडेन.

एकच ज्योत, तिच्या कर्म संचिताप्रमाणे होईल. पण तिच्या कर्मसंचिता पेक्षाही उज्वल ठिकाण मिळवून देईन. मानवाने काय कमवायचे? तर सत् कृती ! ज्याने सत् कमावले, त्याचा केसही वाकडा करू देणार नाही. जो माझ्यात रममाण होतो, मीही त्या ठिकाणी रममाण होतो. ©️

You cannot copy content of this page