Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री एकनाथ महाराज – सद्गुरूंचा महिमा सद्गुरु जाणे. सध्याच्या परिस्थितीत मात्र सद्गुरु महिमा सेवेकर्‍यांना कळणे कठीण आहे. सेवेकरी म्हणजे हा एक त्यांच्या …

श्री समर्थ मालिक – माझ्या पादुका ओळखणाराच ओळखतो. त्या आकाराच्या रूपाने दाखविल्या जातात. नाही पेक्षा मला आकार, विकार, रंग, रुप, आदीअंत, मध्य …

मर्यादा पाळली पाहिजे…©️

मर्यादा पाळली पाहिजे…©️

सध्याची परिस्थिती फार बिकट आहे. याच्याबद्दल काही मानवांना त्याची गरज नाही अन् फिकीर पण नाही. त्यामुळे हा विचार व त्याचे मंथन, दोन्ही आसनावरून चालले आहे.

क्षिराब्धींना आसन आहे अन् या ठिकाणी नाही असे कोण म्हणेल? प्रत्यक्ष कोणाला पाहिजे असेल तर त्याने पाहावे. मानव अंगाने बसणारे त्यांना दिसण्यात येत नाही. प्रकृती ॐ कार स्वरूप बनल्याशिवाय दिसणार नाही.

आपले म्हणणे काय? मर्यादा सांभाळली पाळली पाहिजे. हे सत्य आहे. मर्यादा पाळल्यानंतर ती मर्यादा उपभोगात आणता येते म्हणून पाळली पाहिजे. तत्त्वाला सुद्धा त्याचा दुरुपयोग करता येणार नाही. त्यांना ते कर्तव्य उद्या परवा केलेच पाहिजे. हा आदिअंतापासूनचा सिद्धांत आहे.

आधीच्या काळापेक्षा आत्ताचा काळ फार न्यारा आहे. त्यासाठी कर्तव्य लवकर व्हावे असे आपले म्हणणे आहे. त्यांचेही म्हणणे बरोबर आहे. रामावतारात १४ वर्षे वनवास काढला. त्यात, एक पण आहे. प्रत्यक्ष तत्वाने कार्य केल्यानंतर जी सहनशीलता अंगात उतरलेली असते…..

तत्त्वाच्या अंगात सहनशीलता असते. ती मानवांच्या अंगात नसते म्हणून मानवांची आणि तत्वांची शक्ती एक होऊ शकत नाही. म्हणून ज्या तत्त्वाने १४ वर्षे कष्ट भोगले, तसे कष्ट सेवेकऱ्याने भोगावे का? सेवेकर्‍याला आपल्या बरोबर धरायचे असेल, तर केव्हा अन कधी? तत्त्वाला जर आपल्या बरोबर धरायचे असेल, तर सहनशीलता वाढवून दिली पाहिजे. तत्त्वच प्रकृती नटवून आत चुपचाप आहे. मग त्यांनीच जर सहनशीलता वाढवून दिली तर १४ वर्षे सुद्धा स्वस्थ बसू. ©️

You cannot copy content of this page