Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – मालिक वैकुंठी नाहीत. योगीयांच्या हृदयी नाहीत, तर मग मी कोठे असतो? तर मी सत् भक्तांच्या ठिकाणी असतो. तेथेच …

ज्ञानप्रकाश…भक्तीचे मूळ©️

ज्ञानप्रकाश…भक्तीचे मूळ©️

श्री समर्थ मालिक – मायावी दरबार मध्ये जास्त करून लाघवीला अधिकार असतात. एकचित्तात सेवेकऱ्यास अडचणी आल्या म्हणजे आसनाधिस्तांना सतावतात. पण एकचित्त होताना सेवेकऱ्यांनी एकचित्तता साधावी व एकचित्त होत असताना पाहणी करावी की आपण कोणाशी एकचित्त होत आहोत.

ज्ञानप्रकाश कसा मिळतो? त्याची माहिती शरण गेल्यानेच होते. ज्ञानप्रकाश, मग तेच ते सर्वस्व दाखवतात. तेच भक्तीचे मूळ आहे. सद्गुरुना शरण गेल्यानेच दिव्य प्रकाश निर्माण होतो व ते सताची ओळख करून देतात. प्रत्यक्षात दाखवितात. अन त्यांच्या दिव्य प्रकाशात तल्लीन झाल्यावर पुढे काय? म्हणजे ते कर्तव्य कोणते? नंतर सर्वस्व काय आहे? ते तुझ्या जवळच आहे. मग काशी, पंढरी इत्यादी तिर्थे यांची काय आवश्यकता? जे आहे ते आपल्यातच आहे. भक्ती आहे. सद्गुरु दाही दिशा दाखवितात, फिरवतात. (समाप्त)©️

You cannot copy content of this page