Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तुम्ही पाहता, अनुभवता की इथे लाखो वर्षे तपश्चर्या करणारे ऋषीमुनी सानिध्यात येऊन जातात, सानिध्यात वावरण्याचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरुंचा सेवेकर्‍यावर विश्वास असतो, त्याची परिपूर्णता करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा …

सद्गुरु प्रणवांचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरु प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेकऱ्यांना आपल्या अमृततुल्य बोलांनी समजावून सांगतात. जर सद्गुरूंनी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल, तर …

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

ज्ञान घेतले पाहिजे..©️

ज्ञान घेतले पाहिजे..©️

श्री समर्थ मालिक – ज्ञान अनंत तऱ्हेने घेतले पाहिजे. त्याचा उपभोग घेतला पाहिजे. अनंत तऱ्हेने उपभोग घेतला पाहिजे. तरच त्याप्रमाणे बुद्धी चालते.

गुरुवारच्या दरबार मध्ये जी गती मिळाली, त्यामुळे अनेक सेवेकऱ्यांच्या भावना चलबिचल झाल्या असतील. पहिल्यांदा दोन ज्योती आल्या. नंतर तिसरी ज्योत आली. तदनंतर चौथी ज्योत आली. सेवेकर्‍यांनी ओळखले पाहिजे. त्याच्यासाठी सेवेकर्‍यांना ज्ञान, दिव्यदृष्टी व अनंत चक्षु पाहिजेत. त्याकरिताच त्यांना विचारले म्हणजे सद्गुरूंना विचारावे. म्हणजेच ज्ञान मिळत असते. इतर सेवेकऱ्यांच्या मनात शंका निर्माण झाली की या ठिकाणी अघोर ज्योती आहेत व त्यांनी थैमान घातले. याच्याबद्दल सेवेकऱ्यांना ज्ञान असावयास पाहिजे होते.

ज्ञान सद्गुरु कृपेने मिळते. ज्ञानाचा उपयोग म्हणजे ज्ञानदीप आहे. म्हणजेच ज्ञान आहे असे सिद्ध होते. ज्ञान आहे, त्या ज्ञानाचे कर्तव्य म्हणजे उपयोग झाला पाहिजे. त्याप्रमाणे सेवेकर्‍यांनी वाटचाल करावी. ©️

You cannot copy content of this page