Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तुम्ही पाहता, अनुभवता की इथे लाखो वर्षे तपश्चर्या करणारे ऋषीमुनी सानिध्यात येऊन जातात, सानिध्यात वावरण्याचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरुंचा सेवेकर्‍यावर विश्वास असतो, त्याची परिपूर्णता करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा …

सद्गुरु प्रणवांचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरु प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेकऱ्यांना आपल्या अमृततुल्य बोलांनी समजावून सांगतात. जर सद्गुरूंनी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल, तर …

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

संधी काळ ©️

संधी काळ ©️

श्री क्षिराब्धी – संधी काळात जे सत् आहे, तेवढेच बाजूला करण्यात येईल. बाकी सर्वस्व घेण्यात येणार आहे. त्यातून सुक्या बरोबर थोडे ओल्याला सुद्धा झळ लागेल. याकरिता सेवेकरी व सेवेकरीणी यांनी आपल्या नामस्मरणाच्या गतीने चालत असताना, संधी काळाचा तितका त्रास होणार नाही. आतापर्यंत संधीकाळ संधीकाळ किती वर्षे म्हणत आलो. संधीकाळ ही साधीसुधी गोष्ट नाही. सर्व बाजूंनी विचार करून कार्य करावे लागते. ते करताना सत् कुठे आहे, असत कुठे आहे, कोणत्या बाजूने कार्य करावयाचे त्याचा पूर्णत्व विचार करून कार्य करावे लागते. करायचे आहे. कलियुगातील स्थूलांगी मानवाचेच शुद्धीकरण नव्हे तर, सूक्ष्म, कारण, महाकारण, अणु, रेणू, परमाणु, यांचे हे शुद्धीकरण चालू आहे. अन् आता स्थूल मानवाचे शुद्धीकरण आहे. त्यात चौथ्या टप्प्याचा शेष भागाचे शुद्धीकरण होणार आहे. शुद्धीकरण एका क्षणातही करता येते, पण तसे करावयाचे नाही. कर्तव्य करीत असताना आपले परके पहावयाचे नसते. आपले आहे त्याला विरोध कसा करू ही शंका आणावयाची नाही. पूर्वी जे ऋषीमुनी होते, त्यांचे आश्रम मोठ्या प्रमाणावर होते. त्यांना सुद्धा त्रास होत होता. राक्षस त्यांना सतावित होते. पण हा एका तऱ्हेने कस पहावयाचा असतो. तसा हा कस आहे. महान कोट्यावधी वर्षे तपश्चर्या करणारे ऋषीमुनी असले तरीसुद्धा त्यांचे हाल झाले हे का? सत पदाचा सेवेकरी कर्तव्य करावयाचे झाले तर त्याला कसाला उचलून घ्यावेच लागते. आपणास माहित आहे, सत कर्तव्य होते तो पर्यंतच जवळ घेतले, सत कर्तव्य संपल्यानंतर त्याला दूर फेकण्यात आले. पण जे पूर्णांगी सत आहे त्यांना जवळ करणार, जवळ केले आहे. आपले सेवेकरी मानवी तऱ्हेचे आहेत. त्यांना सद्गुरुं बद्दल किती आपुलकी आहे, हे पाहण्यासाठी हे सर्वस्व करावे लागते. आपणाला कोकणात त्रास झाला हे मला माहित आहे.‌ पण आता सर्वस्व बरोबर होणार आहे. ©️

You cannot copy content of this page