Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री एकनाथ महाराज – सद्गुरूंचा महिमा सद्गुरु जाणे. सध्याच्या परिस्थितीत मात्र सद्गुरु महिमा सेवेकर्‍यांना कळणे कठीण आहे. सेवेकरी म्हणजे हा एक त्यांच्या …

श्री समर्थ मालिक – माझ्या पादुका ओळखणाराच ओळखतो. त्या आकाराच्या रूपाने दाखविल्या जातात. नाही पेक्षा मला आकार, विकार, रंग, रुप, आदीअंत, मध्य …

अखंड पासूनच खंड निर्माण ©️

अखंड पासूनच खंड निर्माण ©️

जगात महान तत्व आहे. त्याच्या अधिकाराप्रमाणे वाटचाल करते. जो सताचा उपासक म्हणजे जातीचा असेल, त्यांनीच ती गती घ्यावयाची. आदीअंता पासून महान ज्ञानी सत् पुरुष यांना प्रतिसृष्टी निर्माण करण्याची ताकद आहे, मग त्याना ती शक्ती नव्हती का? जरूर होती.

हल्लीचा यत्किंचीत मानव चंद्रावर वस्ती करण्याचा प्रयत्न करतो. माझे शास्त्र कोणाला सापडले आहे का?

हा मृत्यू गोलार्ध आहे. हा जडत्व मानव आहे. त्यात अखंड तत्त्वाचा वास आहे. अखंड म्हणजे काय? अन् खंड म्हणजे काय? मग खंड निर्मिती कोणापासून झाली? अखंड पासूनच खंड निर्माण झाला. त्यांनी फेकून द्यावयाचे ठरविले, मग कुठे फेकून देतील हे सांगता येत नाही. म्हणून खंडाने ही धडपड चालविली आहे.

या ठिकाणी जे चालते ते इतर ठिकाणी चालत नाही. मानव व त्याचे कर्तव्य हे प्रथम त्याने शोधावे. मानवाने सत बनण्याचा प्रयत्न करणे. सत बनला की मानवता समजेल. तदनंतर सताची गती. त्याला सताची गती मिळेल मगच तो शरण जाण्याचा प्रयत्न करतो. शरणागत गेल्यानंतर सर्वस्व दिशा त्याला दाखवावी लागते. त्या मानवाजवळ त्रिवेणी संगम असला पाहिजे. मग भगवंताला पाहण्याची महान इच्छा अवश्य प्राप्त होते. मग त्याला जवळ घ्यावे लागते. तो त्या ठिकाणी पूर्णत्वाने लीन होतो. त्या सताने त्याला तिथपर्यंत नेऊन घडवले तरी त्याला सांगता येत नाही. अखंड खंडाला तिथपर्यंत नेऊ शकते. म्हणूनच हे खंड दृश्य आणि अदृश्याचे खेळ आहेत. जे अखंड आहे, ते दृश्य आणि अदृश्याचा खेळ करून बाजूला असते. खंड जे आहे त्याची मनोभावना मर्यादित असते. म्हणून तो फसला जातो. त्याच्या संचितात नसेल तर अपेक्षेप्रमाणे मिळेल कसे? तर मिळणार नाही. सेवेकर्‍याला वर पाठवायचे असेल तर अर्धसमाधी कंठापर्यंत असते. (समाप्त) ©️

You cannot copy content of this page