Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तुम्ही पाहता, अनुभवता की इथे लाखो वर्षे तपश्चर्या करणारे ऋषीमुनी सानिध्यात येऊन जातात, सानिध्यात वावरण्याचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरुंचा सेवेकर्‍यावर विश्वास असतो, त्याची परिपूर्णता करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा …

सद्गुरु प्रणवांचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरु प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेकऱ्यांना आपल्या अमृततुल्य बोलांनी समजावून सांगतात. जर सद्गुरूंनी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल, तर …

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

मनोभावना तृप्त होते कां? ©️

मनोभावना तृप्त होते कां? ©️

श्री समर्थ मालिक – मानवांची मनोभावना कशी तृप्त होते? दुसऱ्याचे ऐकून तृप्त होते कां? तर नाही. जरी ते चंद्रावर गेले, तरी ते महासायासाने गेलेले आहेत. त्याही मानवांच्या अंत:र्यामी मीच आहे. पण यात मेख काय आहे? मानव मनाच्या आधीन होऊन चालला, मग त्याचे कोड कौतुक मला पुरवावे लागते. जास्त काही झाल्यास, मग मला काहीतरी करावे लागते.

चंद्रावर गेले ते कोणत्या ठिकाणी गेले? त्या ठिकाणी गेल्यानंतर कोणत्या ठिकाणी फिरले? त्या ठिकाणी असणारे तत्व कोणत्या रूपात आहे हे पाहिले का? शेवटी काय घेऊन आले? तर दगड घेऊन आले.

मानव उन्मत्त झाल्यानंतर इच्छेला येईल ते करतो. पुढे काय होईल ते सांगता येत नाही. भारतीय लोक परदेशांचा गौरव करतात, पण पुढे काय घडेल हे सांगता येत नाही. पाताळात जाण्याचा प्रयत्न केल्यास तो कसा जाऊ शकेल? पृथ्वीचे दोन भाग करून जाऊ शकेल का? होते ते चांगल्यासाठीच होते.

पृथ्वी हे एक तत्त्व आहे. तिला आकार आहे का? जमीन खोदली दिली तर जमीन परत मिटते का नाही? खोदलेली जमीन आपोआप मिटते. म्हणजे आजूबाजूची माती कोसळते. मग तो खाली जाऊन तिकडे राहील का? त्याच्यासाठी पृथ्वीने पोकळ जागा ठेवली आहे का? ©️

You cannot copy content of this page