Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तुम्ही पाहता, अनुभवता की इथे लाखो वर्षे तपश्चर्या करणारे ऋषीमुनी सानिध्यात येऊन जातात, सानिध्यात वावरण्याचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरुंचा सेवेकर्‍यावर विश्वास असतो, त्याची परिपूर्णता करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा …

सद्गुरु प्रणवांचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरु प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेकऱ्यांना आपल्या अमृततुल्य बोलांनी समजावून सांगतात. जर सद्गुरूंनी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल, तर …

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

संसार नेटका केलाच पाहिजे…©️

संसार नेटका केलाच पाहिजे…©️

श्री समर्थ मालिक – सर्व समर्थमय करावयाचे असेल तर संसार नेटका केलाच पाहिजे. ज्याचा संसार नेटका नाही, ती ज्योत गतीमान होणारं नाही. शांती मिळणार नाही. माया आणि ज्योत यामध्ये संघर्षात जी ज्योत आहे, ती स्थिर होऊ शकते. मायेला स्थिर करीत नाही, तोपर्यंत स्थिर होईल कसा?

जोपर्यंत सत् ओळखले नाही, तोपर्यंत सत् नाही. म्हणून सताचे आदेश मानणे हे कर्तव्य आहे. जोपर्यंत मानीत नाही, तोपर्यंत काही नाही.

या दरबारात ज्यांना ज्यांना अखंड नामाची गती दिली, ते सुद्धा म्हणतात, बाबा हे बघा, ते बघा. अजून मायेत आहेत. पण त्या सेवेकर्‍याला कळले असते तर? कळले म्हणावे तर सेवेकऱ्याने कुटुंबाला का शांती देऊ नये? एवढा अधिकार दिला आहे. ते म्हणतात, तुम्ही हात फिरवा. मग ज्याचा त्यानेच हात फिरवावा. ते करून पहा. हे करायचे सोडून, तुम्ही करा, तुम्ही बघा. म्हणून जेवढे तुम्ही आचरणात आणाल, एवढा तुम्हाला फायदा होईल. सर्वांनी आपल्या कर्तव्यात रहा हे संदेश आहेत. (समाप्त) ©️

You cannot copy content of this page