दिनांक: १६ डिसेंबर १९७२ रोजी साजरा करण्यात आलेल्या श्री सद्गुरु भंडारा उत्सवावेळी श्री समर्थ मालकांनी दिलेले शुभसंदेश –
प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी हा सुख सोहळा अधिक आनंदी वातावरणात साजरा होत आहे याबद्दल चिंता नको. माझा मीच आनंदात होतो. सेवेकर्यांनी शुद्ध भावनेने केलेली सेवा चरणांवर रुजू होत असते. रुजू करून घ्यावी लागते. ज्याप्रमाणे वर्षानुवर्षे या वातावरणाच्या त्रिवेणी संगमात सेवेकरी डुंबतात, त्याचप्रमाणे आम्हीही या वातावरणात डुंबत आहोत.
सत्पुरुषांचा तांडा आहेच. त्याचप्रमाणे गणगंधर्वही या ठिकाणी आहेत. अन्नपूर्णा अजून पर्यंत या ठिकाणी आहे. पाहणाऱ्यांनी पाहिले असेलच.
मागील आदेशाप्रमाणे वरचेवर घडत आले आहे यात शंका नाही. येथून पुढे काय होईल हे सांगता येत नाही. उ:षापाचा काळ संपत आला आहे. आणखीन काही दिवस त्रास होईल, पण सेवेकर्यांनी बिलकुल घाबरू नये. तिजोरी (अखंड पदाचे अखंड नाम) दिली आहे. तिची जोपासना करणे.
हल्ली ठिक ठिकाणी अनुभव मिळत आहे. संकटाच्या वेळीच मानवांना माझी आठवण होत असते. सुखी असले तर हजार दैवते पुजतात. पण अखेरीस माझी आठवण होते. आठवण करतो. इथून पुढे फारच दिवस कठीण आहेत. ते पहाल, सांगू शकाल. मात्र जे कर्तव्य आहे ते चालूच राहील. यात न्यूनता होणार नाही. सेवेकऱ्यांनी चिंता करावयाची नाही. मात्र दिलेली तिजोरी चोख ठेवण्याचा प्रयत्न करणे. मी एकाच नामातीत आहे यातील अर्थ आपण ओळखावा. ©️
