Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तुम्ही पाहता, अनुभवता की इथे लाखो वर्षे तपश्चर्या करणारे ऋषीमुनी सानिध्यात येऊन जातात, सानिध्यात वावरण्याचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरुंचा सेवेकर्‍यावर विश्वास असतो, त्याची परिपूर्णता करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा …

सद्गुरु प्रणवांचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरु प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेकऱ्यांना आपल्या अमृततुल्य बोलांनी समजावून सांगतात. जर सद्गुरूंनी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल, तर …

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

एक तत्त्व नाम…©️

एक तत्त्व नाम…©️

श्री समर्थ मालिक – “एक तत्त्व नाम दृढ धरी मना |” जो आपली भावना दृढ धरून, त्या तत्त्वाशी ठाम राहू शकतो, एक सेकंद सुद्धा इकडे तिकडे ढळत नाही, तो सेवेकरी कदापिही वाया जाऊ शकणार नाही आणि जाणारही नाही, पण मनाची चंचलता वाढली तर मात्र त्याचे त्याने समजावे. मी सांगण्यात अर्थ नाही.

शरीर हे जडत्व आहे. तेव्हा जडत्वावर वाटेल ते व्याप, मायावी तऱ्हेचे म्हणा किंवा आणखी काही म्हणा, जर झाले, तर, सेवेकऱ्याने मनाची जी स्थीरता, जी अदला बदल होते, ती होऊ न देता स्थीर राहण्याचा प्रयत्न करणे. जेवढी होता होईल तेवढी शांती टिकविण्याचा प्रयत्न करणे, तदनंतर त्याचा उपभोग घेणे, अवश्य मिळेल. हे मात्र असत नाही, सत्य आहे. त्याप्रमाणे आपापल्या कर्तव्यात, अखंड नामात, मन स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करणे.

आपल्या संगतीने काय येणार, हे सेवेकऱ्यांना माहित झाले असेलच. संगती जे येईल तेच घेण्याचा प्रयत्न करणे. या जन्मी कमावलेली सत् संपत्ती, तिचा पुढील जन्मी उपभोग घेता येईल. सध्या दुःख वाटते, पण दुःख वाटून न घेता शांत रितीने राहणे, वावरणे हे सेवेकऱ्यांचे कर्तव्य आहे व हे संदेश आहेत. ©️

You cannot copy content of this page