Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तुम्ही पाहता, अनुभवता की इथे लाखो वर्षे तपश्चर्या करणारे ऋषीमुनी सानिध्यात येऊन जातात, सानिध्यात वावरण्याचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरुंचा सेवेकर्‍यावर विश्वास असतो, त्याची परिपूर्णता करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा …

सद्गुरु प्रणवांचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरु प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेकऱ्यांना आपल्या अमृततुल्य बोलांनी समजावून सांगतात. जर सद्गुरूंनी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल, तर …

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

नामाची पंढरी कशी दुमदुमून जाईल…©️

नामाची पंढरी कशी दुमदुमून जाईल…©️

श्री समर्थ मालिक – विठ्ठल विठ्ठल गजरी |

अखंड तत्व (म्हणजे त्या सताचे नाम) सत् पदाच्या आसनावरून आपल्या सद्गुरुंनी आपल्याला बहाल केलेले आहे. सत मुखातील वाणी म्हणे, विठ्ठल विठ्ठल गजरी | अवघी दुमदुमली पंढरी ||

नामाचा गजर कोठे होतो अन् त्या नामाची पंढरी कशी आहे, कोठे आहे, कशी दुमदुमून गेली होती, कशी दंग झालेली होती विठ्ठल नामात? मग त्याचप्रमाणे सेवेकरी त्या नामाने, विठ्ठल नामाने दुमदुमला जाईल, तर त्या नामाने दुमदुमलेली पंढरी शुद्ध असेल की अशुद्ध असेल? शुद्ध असेल. मग त्याप्रमाणे आपल्या दरबारातील सेवेकरी त्या नामाने दुमदुमलेले आहेत का? त्या विठ्ठल नामाने जर सेवेकर्‍यांनी पंढरपुरी दुमदुमून गेलेली आहे, तर आणखी इतर व्याप आणि इतर तऱ्हा का लागू पडतील? हे योग्य आहे काय कि अयोग्य आहे? सेवेकर्‍यांनी हे लक्षात ठेवावे की याच्यातच मर्म आहे. ते आकळले पाहिजे.

प्रकृती म्हणजे ती पंढरी आहे. विठ्ठल नामाने ती दुमदुमून गेली पाहिजे. मग त्या मायेला बंधन घालून दुमदुमलेले पडसाद पडले मग इतर निसर्गाचे लाघव होतील काय? अखंड तत्व तुमच्यापासून दूर होईल काय? मग सेवेकर्‍यांनी खरोखरच काय करावयास पाहिजे? तर नाममय झाले पाहिजे. मग आपणांस सद्गुरु दर्शन दूर नाही. पण इतकेच, आपले सेवेकरी तितके तन्मय होत नाहीत. सेवेकरी अशा दुमदुमल्या पंढरीमध्ये, त्या नादात तल्लीन झाला आहे काय? गुंग झालेला आहे काय?

मी सांगतो ते आपल्याला टोचक शब्द आहेत. आपण त्यातच लयबद्ध व्हा. प्रकृती अभिन्न झाल्यावर, मग तुम्ही आणि मी एकच ! एवढे होण्यासाठी पुष्कळ सेवेकरी आनंदी वातावरणात असावेत. कोणीही कोणाला वाईट इच्छेने वागवू नये. सेवेकर्‍यांनी सेवेकर्‍याला वाईट भावनेने पाहू नये अन् अमृता पेक्षाही गोड प्रेमाने वागावे असे संदेश आहेत. सख्खे भाऊ, केव्हा ना केव्हा, कधीतरी वाटा मागणारच, पण हे गुरुबंधूंचे नाते आहे. तो केव्हाही वाटा मागणार नाही. तो उपयोगी पडेल. त्याप्रमाणे सेवेकर्‍यांनी वागावे अन् हसत खेळत काळ घालवला पाहिजे. पण हा काळ अगदी नजीक येत आहे. एकमेकांचे प्रेम, अखंड झरा हृदयामध्ये कसा पाझरेल ते लक्षात ठेवा. म्हणजे सांगितल्याप्रमाणे विठ्ठल नामाची पंढरी कशी दुमदुमून जाईल ते केल्यानंतर समजेल. तोपर्यंत नाही. (समाप्त)©️

You cannot copy content of this page