Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तुम्ही पाहता, अनुभवता की इथे लाखो वर्षे तपश्चर्या करणारे ऋषीमुनी सानिध्यात येऊन जातात, सानिध्यात वावरण्याचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरुंचा सेवेकर्‍यावर विश्वास असतो, त्याची परिपूर्णता करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा …

सद्गुरु प्रणवांचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरु प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेकऱ्यांना आपल्या अमृततुल्य बोलांनी समजावून सांगतात. जर सद्गुरूंनी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल, तर …

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

काहीतरी सांगा…©️

काहीतरी सांगा…©️

श्री संत नामदेव महाराज – ज्याने या सर्वस्व ब्रह्मांडाची रचना केली, आकाश, पृथ्वी, सर्वस्व सृष्टीची रचना केली, ते तत्व आमच्या सारख्या अज्ञानी सेवेकऱ्यांना म्हणतात, “काहीतरी सांगा.” पण मी काय सांगावे?

आज या अज्ञानी, अडाणी सेवेकऱ्याची कशी काय आठवण झाली? आज महान भाग्य म्हणजे, सता आपले दर्शन मिळावे ही इच्छा आहे.

अनंत लाघवी तत्व, न धरता येणारे, न सापडणारे, अशांचे गुणवर्णन करणे, त्यांच्याविषयी भक्तीयुक्त प्रवचन सांगणे, म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेतल्यासारखे होईल. त्यांच्या भक्ती विषयी मी काय सांगणार? माझ्या सद्गुरुंपेक्षा दैवत श्रेष्ठ नाही, हे आपल्या चरणांजवळ निवेदन करावे लागते.

हल्लीच्या परिस्थितीमध्ये भक्ती करण्याची सर्वांना आवड असते. त्यात एकच, कुणाला गुळाची चव, तर कुणाला साखरेची चव असते, कुणाला खमंग आवडते, तर कुणाला तिखटाची गोडी असते, कुणाला कशाची, तर कुणाला कशाची? आज अशा तऱ्हेने मानव वाटचाल करीत आहे. ज्याला माहित आहे की हे पदार्थ कशापासून होतात, त्याने त्या निर्माण कर्त्यालाच पकडलेले असते. ©️

You cannot copy content of this page