श्री समर्थ मालिक – दुसरी गोष्ट, सेवेकरी ठाम आहेत इतकेच खरे आहे. जे होणार आहे, ते कधीही चुकणार नाही. जी घडण घडणार असेल, ती घडल्याशिवाय राहणार नाही. या भारत भूमीबद्दल मागेच बोल दिलेले आहेत. पण भारतामध्ये अघोर, आप मतलबी, वाईट वर्तणूक, गरीबांकडे दुर्लक्ष, स्वतःचा स्वार्थ साधूपणा याला ऊत आलेला आहे. या अघोरांनी जास्त थैमान घातलेले आहे. याची घुसळण केल्याशिवाय काही होणार नाही, म्हणून या मानवांकडून काहीतरी पाप घडल्याशिवाय गत्यंतर नाही म्हणून हे असे होत आहे. ते पूर्ण झालेले नाही म्हणून हात घालता येत नाही. शिशुपाळाचे १०१ अपराध घडले, पण आताच्या काळात १०१ व्हायला नकोत. पूर्ण तरी झाले पाहिजेत, मग विलंब लागणार नाही.
आता काळ नजीक आलेला आहे. पुढे काय होणार हे मी सांगत नाही अन् सांगणारही नाही. आपण पाहत राहणे. कृष्णाने कंसाशी तसेच इतर अघोर मानवांची जशी घुसळण केली त्याच तऱ्हेची गती आता होणार आहे. नैसर्गिक गतीकडून ते करून घेणार आहे. त्याचप्रमाणे मानवी कृती कडूनही घुसळण होणार आहे. आपल्या दृष्टीसमोर सर्वस्व खेळ असेलच. मानव कसा चालला आहे हे आपण पाहतच आहात. मागे म्हणत होता, बिचारे पशुपक्षी यांनी काय केले आहे? परंतु पशुपक्षी यांचे जरी हाल झाले तरी त्यांना देहात कुठपर्यंत ठेवायचे? त्यांना कोणत्या ना कोणत्या तऱ्हेने मोकळीकता करावयास हवी.
अदृष्य शुद्धीकरण जे आहे ते थोडेसे आहे. अखेर अखेर संपूर्ण झाल्यानंतर या भारत भूमीचे आणि महाराष्ट्राचे शुद्ध व पवित्र देशात रूपांतर करावे लागेल. मग आपणास सुख सोहळा पहावयास मिळेल. म्हणजे सर्वस्व संपले. अघोरांची घुसळण झाल्यानंतर भूमी शुद्ध करण्यास वेळ नाही. भूमी शुद्ध झाली की उ:षापाचे काय करायचे ते आपणास माहित आहे. सर्वस्वांना बोलावून हे प्रणव का व कशासाठी बाहेर पडले ते दोघांना विचारावयाचे आहे. मग दोघांचेही बोल ऐकावयास मिळतील. तदनंतर शापातून मुक्तता होईल. म्हणून तो काळ आता अगदी नजीक आला आहे. जस जसा काळ नजीक येईल, तस तसा मानवांना त्रास होण्याचा संभव आहे. तरीपण सेवेकर्यांनी धीर सोडता कामा नये. आपल्या कर्तव्यात जागृत राहणे. ©️
