Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तुम्ही पाहता, अनुभवता की इथे लाखो वर्षे तपश्चर्या करणारे ऋषीमुनी सानिध्यात येऊन जातात, सानिध्यात वावरण्याचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरुंचा सेवेकर्‍यावर विश्वास असतो, त्याची परिपूर्णता करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा …

सद्गुरु प्रणवांचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरु प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेकऱ्यांना आपल्या अमृततुल्य बोलांनी समजावून सांगतात. जर सद्गुरूंनी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल, तर …

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

वेळ आली म्हणजे खेळ दिसेल…©️

वेळ आली म्हणजे खेळ दिसेल…©️

श्री समर्थ मालिक – सेवेकरी म्हणा, भक्त म्हणा याचे बोलणे जास्त, पण कृती कमी अशा तऱ्हेची गती असू नये. इतकेच काय, त्यांना एवढे सुद्धा भान राहत नाही कि मी हे कोणाच्या कृपेने करीत आहे? त्याचा मनाची समजूत होते कि मी कोणीतरी विशेष आहे. याचे जर त्याला भान असेल तर बोल घेवडेपणा कमी करेल. दुसरी गोष्ट, सेवेकरी ठाम आहेत खरे आहे. जे होणार आहे ते कधीही चुकणार नाही. जी घडण घडणार असेल, ती घडल्याशिवाय राहणार नाही.

याभूमीमध्ये अघोर, आपमतलबी, वाईट वर्तणूक, गरीबांकडे दुर्लक्ष, स्वतःचा स्वार्थ साधूपणा याला ऊत आलेला आहे. या अघोरांनी जास्त थैमान घातलेले आहे. याची घुसळण केल्याशिवाय काही होणार नाही. या मानवांकडून काहीतरी पाप घडल्याशिवाय गत्यंतर नाही, म्हणून हे असे होत आहे. ते पूर्ण झालेले नाही म्हणून हात घालता येत नाही. शिशुपाळाचे १०१ अपराध घडले. आताच्या काळात १०१ व्हायला नकोत, मग विलंब लागणार नाही.

आता काळ नजीक आलेला आहे. पुढे काय होणार हे मी सांगत नाही अन् सांगणारही नाही. आपण पाहत राहणे. कृष्णाने कंसाशी तसेच इतर अघोर मानवांची जसी घुसळण केली त्याच तऱ्हेची गती आता होणार आहे. नैसर्गिक गतीकडून ते करून घेणार आहे. त्याचप्रमाणे मानवी कृती कडूनही घुसळण होणार आहे. आपल्या दृष्टीसमोर सर्वस्व खेळ असेलच. मानव कसा चालला आहे हे आपण पाहतच आहात. आपण मागे म्हणत होता, बिचारे पशुपक्षी यांनी काय केले आहे? परंतु पशुपक्षी यांचे जरी हाल झाले तरी त्यांना देहात कुठपर्यंत ठेवायचे? त्यांना कोणत्या ना कोणत्या तऱ्हेने मोकळीकता करावयास हवी. अदृष्य शुद्धीकरण जे आहे ते थोडेसे आहे. ©️

You cannot copy content of this page