Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – मालिक वैकुंठी नाहीत. योगीयांच्या हृदयी नाहीत, तर मग मी कोठे असतो? तर मी सत् भक्तांच्या ठिकाणी असतो. तेथेच …

प्रबोधन ©️

प्रबोधन ©️

श्री समर्थ मालिक – पृथ्वीच्या पृष्ठभागावर अनेक तत्त्वे फेकलेली आहेत. त्यांना काही अधिकार दिलेले आहेत. त्या अधिकाराच्या अनुसंधनाने आपले कर्तव्य ते करीत असतात. त्यातून चूक जरी झाली तरी पण त्यांना समजूतीने गती देऊन क्षमा केली जाते. त्या अधिकारात थोडेसे तुझे माझे होते. जसे भक्त, त्या बाजूने ओढण होते. म्हणून मला त्या ठिकाणी जावे लागते. सेवेकऱ्यांची बाजू मांडणे त्यांचे कर्तव्य आहे. कर्तव्य जर सत असेल, तर तेथे मला काही करता येत नाही.

दुसरी गोष्ट, सेवेकरी भक्तीच्या मार्गाने जात असला तरी त्याच्या चुका सुधारण्याकरिता लाघव करावे लागतात. त्याचे कारण एकच की, त्याच्या चुका होऊ नयेत. वाकडे पाऊल पडू नये. वाकड्या मार्गाने जाऊ नये. त्याला सरळ करण्यासाठी केव्हाही मोकळा सोडीत नाही. त्याला सरळ करून परत सत् मार्गावर आणावे लागते. जे या ठिकाणी सतयुक्त गतीने आहेत, ते मात्र अनुभवासाठी कुठेही जाणार नाहीत. तत्त्वच्यूत होणार नाहीत. काही असे हुषार मानव आहेत, तर्कज्ञानी आहेत ते आपणाला ठाऊक आहेत.

या ठिकाणी नमस्कार चमत्कार होणार नाहीत. भक्ती ही शुद्ध स्फटिका सारखी चमत्कार, तंत्र-मंत्र, ऋद्धी-सिद्धी रहित आहे. या बाबतीत जो रममाण झाला, त्याचा कोणीही केस वाकडा करू शकणार नाही. मात्र त्याचे जे कर्मसंचित आहे, ते याच देही भोगायला लावून तो पुढील जन्मी धुतल्या तांदळासारखा राहावा म्हणून भोगत्व भोगताना त्याने वाईट वाटून घेऊ नये. कर्मसंचिताप्रमाणे थोडासा जरी त्रास झाला तरी वाईट वाटून घेऊ नये. आपले कर्तव्य जे आहे त्यात ठाम राहणे. ©️

You cannot copy content of this page