Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री एकनाथ महाराज – सद्गुरूंचा महिमा सद्गुरु जाणे. सध्याच्या परिस्थितीत मात्र सद्गुरु महिमा सेवेकर्‍यांना कळणे कठीण आहे. सेवेकरी म्हणजे हा एक त्यांच्या …

श्री समर्थ मालिक – माझ्या पादुका ओळखणाराच ओळखतो. त्या आकाराच्या रूपाने दाखविल्या जातात. नाही पेक्षा मला आकार, विकार, रंग, रुप, आदीअंत, मध्य …

काहितरी घडणारच आहे… ©️

काहितरी घडणारच आहे… ©️

कलियुगाचा मध्य उलटला आहे. काहितरी घडणारच आहे. गती घेण्याचा काळ अगदी समीप आला आहे. ज्या वेळेला कर्तव्य परायणता होईल, त्यावेळेला पूर्णत्वाने संदेश मिळतील. दिले जातील. चिंता करावयाची नाही. सत्य म्हटले तर हे कलियुग आहे. सत आहे. ते सत् तरी कशावरून?

कोकणात पडलेले आसन हे चमत्काराने नटलेले आसन आहे हे सत्य समजा. दंडकारण्यात सर्वत्र अघोरी तत्वे विखुरली होती. एक, दोन, तीन शुद्धीकरणे घेतली तरी ती भूमी अजून शुद्ध झालेली नाही. अशीच शुद्ध होत होत ती पूर्णत्वाने शुद्ध होईल. ती शुद्ध आणि पवित्र आहे. चमत्कार त्या ठिकाणी होतील. परंतु थोडासा अवधी आहे.

चमत्कार करावयाचे आहेत, ते याची देही याची डोळा पहावयास मिळतील. आजची गती जरी नाराजीची वाटली तरी नाराज व्हायचे नाही. सताला नेहमीच त्रास होतो, त्यावेळेला नाराजी होते. कर्तव्य करताना जो आनंद तो फार निराळा असतो. कर्तव्य केल्यानंतर जी ठेवण मिळते ती अखंड असते.

सातारला पण मानवी गतीप्रमाणे त्रास झाला. पण आसन त्याच ठिकाणी आहे. मानव जरी सत् तत्त्वाचा अंश असला तरी कालचक्रात जर सापडला तर तो सतापासून वेगळा राहतो. मग पळून जातो कोण? त्रास होतो हे मला मान्य आहे. त्या ठिकाणी मानवी गतीप्रमाणे भक्तीयुक्त वातावरण निर्माण झाले पण केव्हा? सत् हे अखंड पाठीशी आहेत हे समजल्यानंतरच ना? पण त्रास देणाऱ्याची कोणती गती झाली? पळून गेला कोण? आता त्या ठिकाणी मानाने, डौलाने त्या आसनाजवळ मिरवता आहेत ना? (समाप्त) ©️

You cannot copy content of this page