Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तुम्ही पाहता, अनुभवता की इथे लाखो वर्षे तपश्चर्या करणारे ऋषीमुनी सानिध्यात येऊन जातात, सानिध्यात वावरण्याचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरुंचा सेवेकर्‍यावर विश्वास असतो, त्याची परिपूर्णता करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा …

सद्गुरु प्रणवांचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरु प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेकऱ्यांना आपल्या अमृततुल्य बोलांनी समजावून सांगतात. जर सद्गुरूंनी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल, तर …

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

गुरुपद – २ ©️

गुरुपद – २ ©️

श्री समर्थ मालिक – एकमेक एकमेकांवर अवलंबून आहेत. आपण मानव आहात. संशयात, षड्रिपूच्या जाळ्यात गुरफटले आहात. या सर्वस्वातून सुटका करणारे, एक महान श्रेष्ठ पद आहे. तेच हे गुरुपद आहे. त्या गुरुपदाशिवाय सेवेकऱ्यांना वाचविणारे, तारणारे, त्यांचे कोडकौतुक पुरविणारे दुसरे कोणीही नाही. सद्गुरु आणि सेवेकरी यांचे नाते संबंध फार निराळे आहेत, वेगळे आहेत. आपल्या सेवेकऱ्यांसाठी ते हेलावतात. लयबद्ध होतात. कोणालाही ते दूर लोटित नाहीत. असे हे पूर्णत्वाने दयाघन तत्व आहे. ही दया इतर ठिकाणी आढळणार नाही. सेवेकरी कोणत्याही तऱ्हेचा असो, तो सद्गुरुमय व्हावा अशी त्यांची आंतरिक तळमळ असते.

कर्तव्य केल्यानंतर मुक्ती आणि मोक्ष दूर नाही. आपण जाणते सेवेकरी आहात. ओळखण्याची खूण थोडी आहे, ती ज्याला मिळाली तो धन्य होय. ज्यांना मिळाली नाही, त्यांनाही ती मिळेल. पण हळूहळू कालांतराने.

हे सानिध्य मिळायला भाग्य लागते. सेवेकऱ्यांना सद्गुरु कधीही दूर लोटित नाहीत. दूर जाऊ देत नाहीत. असे हे दोन तत्त्वात भरलेले सद्गुरुपद, याचाच ठाव सेवेकर्‍यांनी घेणे. हे त्यांचे आद्य कर्तव्य आहे. प्रत्येक वेळेला, प्रत्येक क्षणाला सेवेकऱ्याला आपल्या अमृतमय वाणीने सिद्ध करण्यासाठी संदेश देत असतात. ते संदेश सेवेकऱ्यांनी पाळावयाचे असतात. या संदेशांना फार महत्त्व आहे. याचे निवेदन केलेले आहे. जरी सेवेकर्‍यांनी संदेश पाळले नाहीत, तरी सद्गुरु कोपिष्ट होणार नाहीत. त्याला गोड शब्दात समजावून सांगतील. ©️

You cannot copy content of this page