Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तुम्ही पाहता, अनुभवता की इथे लाखो वर्षे तपश्चर्या करणारे ऋषीमुनी सानिध्यात येऊन जातात, सानिध्यात वावरण्याचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरुंचा सेवेकर्‍यावर विश्वास असतो, त्याची परिपूर्णता करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा …

सद्गुरु प्रणवांचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरु प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेकऱ्यांना आपल्या अमृततुल्य बोलांनी समजावून सांगतात. जर सद्गुरूंनी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल, तर …

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

लिनता, नम्रता आणि शांती ©️

लिनता, नम्रता आणि शांती ©️

श्री विठ्ठल – दृष्य आणि अदृष्य हे एकमेकांवर अवलंबून असते. बोलता आणि बोलविता यात अंतर आहे. एकच ते बोलते अन् बोलवून घेते. लिनता, नम्रता आणि शांती हा त्रिवेणी संगम कोणत्याही तत्वाजवळ असलाच पाहिजे. ज्याच्या अंगी हा त्रिवेणी संगम नाही, तो सत् तत्वाजवळ जाऊ शकत नाही. पण जातो. केव्हा अन् कधी? जे सत् तत्व आहे ते भक्ताला कधी सानिध्यात घेतील ते त्यांच्यावर अवलंबून आहे. मीच सर्वस्वाचे निधान आहे असे नाही. एकमेक एकमेकावर अवलंबून आहेत.

आपण प्रत्यक्ष आहात. मी अदृष्य आहे. प्रत्यक्ष स्थूल देही व्यवहार या ठिकाणी आहे. लाखावर यात्रा जरी भरली तरी मला कोणी पाहिले नाही. पाहणारे भक्त गेले. आता या काळात कोणीही नाही. हौसे, नवसे, गवसे हे त्या ठिकाणी गेले आहेत. सत् भक्त म्हणून नाही. आपल्या आदेशा प्रमाणे त्या ठिकाणचे परिवर्तन चालले आहे. मालिक कोणास म्हणावे, हे सुद्धा मला कळेनासे झाले आहे.

आत्ताचा काळ तसा नाही. भाविक भक्त म्हणावे तर ती ज्योत भक्तीतच रममाण झाली पाहिजे. भक्तीत रममाण झाली, तर एवढ्या लांब येण्याची आवश्यकता काय? सेवेकरी देऊन देऊन काय देणार आहे मला? कोणत्या गोष्टीची कमतरता आहे का? कोणीही भक्त बिलकुल मागणी न करता परतला आहे का? मग हे भक्त आहेत असे म्हणता येईल का? ©️

You cannot copy content of this page