Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तुम्ही पाहता, अनुभवता की इथे लाखो वर्षे तपश्चर्या करणारे ऋषीमुनी सानिध्यात येऊन जातात, सानिध्यात वावरण्याचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरुंचा सेवेकर्‍यावर विश्वास असतो, त्याची परिपूर्णता करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा …

सद्गुरु प्रणवांचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरु प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेकऱ्यांना आपल्या अमृततुल्य बोलांनी समजावून सांगतात. जर सद्गुरूंनी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल, तर …

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

अमोल बोल ©️

अमोल बोल ©️

श्री समर्थ मालिक – यश हे अवश्य आहे, पण कधी कधी सत् सेवेकऱ्याला असताचे चटके बसतात. त्याला असताचे चटके बसून बसून यश हे आपोआप निर्माण होते. मात्र त्याला हे कळत नाही कि हे यश कशापासून मिळाले. हर्ष युक्त झाला की त्याला वाटते हे मीच करतो. पण यश आल्यानंतरच त्याची हर्ष युक्त भावना असते, पण जोपर्यंत कर्तव्य होत नाही, तोपर्यंत तो नाराजच असतो.

एकदम अघोरावर हात टाकायचा, तो विचार करूनच टाकावा लागतो. म्हणून वेळ लागतो.

दोन तत्वे अमर आहेत. आहेत तीन, पण एक नाशिवंत आहे. जडत्व हे पाच तत्वांचे आहे. त्यामुळे हे पाच तत्वात मिलन करायला लागते. अमर दोन पदे आहेत, ती दिसणार नाहीत. ते अखंड तत्व अन ॐ कार बीज ! या दोन्हीचा नाश कोणी केला आहे का? ©️

You cannot copy content of this page