Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तुम्ही पाहता, अनुभवता की इथे लाखो वर्षे तपश्चर्या करणारे ऋषीमुनी सानिध्यात येऊन जातात, सानिध्यात वावरण्याचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरुंचा सेवेकर्‍यावर विश्वास असतो, त्याची परिपूर्णता करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा …

सद्गुरु प्रणवांचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरु प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेकऱ्यांना आपल्या अमृततुल्य बोलांनी समजावून सांगतात. जर सद्गुरूंनी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल, तर …

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

क्षमा – अंतही नाही, पारही नाही ©️

क्षमा – अंतही नाही, पारही नाही ©️

श्री समर्थ मालिक – प्रथम चूक करावयाची आणि नंतर क्षमा मागवयाची, क्षमा करा, क्षमा करा. त्या क्षमेला अंतही नाही आणि पारही नाही. ज्या दिनाला शरण गेलात, त्याचे आदेश संदेश पाळणे हे सेवेकर्‍याचे कर्तव्य आहे की नाही? एक दोन अशा कितीतरी चुका आहेत. सर्वस्व क्षमेचाच पसारा मांडलेला आहे. म्हणजे तत्त्वात ते रममाण, लिन झालेत का? त्यांनी तत्व ओळखले आहे का? सर्वस्व मनाचा खेळ चाललेला आहे असे म्हणावे कां?

सानिध्यात दोन-तीन ज्योती आलेल्या आहेत, एकही सुधारत नाही. हे सर्वस्व मालिक करून घेतात असेही काही सेवेकरी म्हणतात. जी ज्योत ज्या दिनाला शरण आहे, त्यांच्या आदेशाशिवाय आत येऊ शकते का? अनेक सेवेकरी असे आहेत की त्या दिनाचा आदेश मानत नाहीत. ज्यावेळेला ते सांगतात, ते ऐकून घेतात. पण केव्हा? हे सांगता येत नाही. सेवेकर्‍यांनी आपल्या कर्तव्यात राहणे हे संदेश आहेत. (समाप्त) ©️

You cannot copy content of this page