Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – मालिक वैकुंठी नाहीत. योगीयांच्या हृदयी नाहीत, तर मग मी कोठे असतो? तर मी सत् भक्तांच्या ठिकाणी असतो. तेथेच …

तत्व भिन्न…३ ©️

तत्व भिन्न…३ ©️

याप्रमाणे सेवेकरी होऊ लागला तर त्या ठिकाणी लाघवीचे काही चालत नाही. मीच थोडीशी पाहणी करतो. सेवेकरी तत्त्वाच्या ठिकाणी ठाम झाले तर मला काही करता येत नाही. मी आकारी आहे अन निराकारी पण आहे. पण एकच म्हणावयाचे, जे आकाराकडून संदेश मिळतात, सांगणे होते त्याची जोपासना सेवेकर्‍यांनी केली आहे की नाही कोण जाणे. तरी सेवेकर्‍यांनी सांगितल्याप्रमाणे वर्तणूक ठेवणे. कबूल आहे? त्या ठिकाणी थोडासा का होईना विचार करावा लागतो.

सेवेकरी थोडासा मनाच्या आधीन बनला, मनाप्रमाणे चालला मग त्या ठिकाणी थोडेसे लाघव करावे लागतात. मनाच्या आधीन बनणारे सेवेकरी नसतील आणि नाही तर सेवेकरी एवढ्या पाठीमागे राहिले नसते. जे जे सेवेकर्‍याच्या मनाला येईल त्याचे गोड कौतुक समर्थ पुरवतात. पुरवले जाते. मनाचे आधीन असले तरी त्या सेवेकऱ्याचे कोडकौतुक पुरविण्याचे बाकी ठेवले आहे का? सेवेकरी मी रहित, मनाचे जोगे सिद्धी पावे असे होतील, पण सेवेकरी होत नाहीत. त्याला मी काय करावे? बघा. प्रयत्न करा. आसनाधीस्त काय सांगतात ते ऐका. विचारवंत व्हा अन् काही करा. एवढे संदेश देत आहे. शांतता आणि समता या ठिकाणी ठेवलीच पाहिजे. आता इथून पुढे सेवेकर्‍यांनी विचार विनिमय करण्याचा प्रयत्न करावा. (समाप्त ©️)

You cannot copy content of this page