Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तुम्ही पाहता, अनुभवता की इथे लाखो वर्षे तपश्चर्या करणारे ऋषीमुनी सानिध्यात येऊन जातात, सानिध्यात वावरण्याचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरुंचा सेवेकर्‍यावर विश्वास असतो, त्याची परिपूर्णता करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा …

सद्गुरु प्रणवांचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरु प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेकऱ्यांना आपल्या अमृततुल्य बोलांनी समजावून सांगतात. जर सद्गुरूंनी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल, तर …

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

घोडबंदरचे बाबा ३ ©️

घोडबंदरचे बाबा ३ ©️

बाबा – तुम्हाला प्रत्यक्षात अनुग्रह दिला, मग त्यांनी असे सांगितले का अशा मार्गाने जा.

गोपाळकृष्ण – त्यांनी असे सांगितले नाही. मला ज्यांनी अनुग्रह दिला त्यांनीच तुम्हाला अनुग्रह दिला. आपल्या चरणी क्षमेची याचना करीत आहे. बच्चा म्हणण्याची माझी आता पात्रता नाही.

बाबा – आपले काय निवेदन आहे?

गोपाळकृष्ण – माझे एकच निवेदन आहे. आंधळ्याचे मागणे काय असते? दोन डोळे. दुसरे काय मागणार? समर्थांजवळ दया असेल तर मोकळे करतील.

बाबा – ही तुमची कोड भाषा काय आहे? मला समजत नाही.

गोपाळकृष्ण – माझी कोड भाषा नाही. स्पष्ट निवेदन आहे. भुकेलेल्याला अन्न पाहिजे. दुसरे काय. जे आसनावर तत्व आहे, खंड काळात पडलेल्याला ओढून काढणे आपल्या आधीन आहे.

बाबा – तुमची इच्छा सर्व योनीतून मुक्त व्हावयाची आहे. मग तुम्ही कोठे राहणार? घोडबंदरला की काशी-मीराला?

गोपाळकृष्ण – तुमच्या इच्छेप्रमाणे ! माझ्याजवळ दर्शविण्यासाठी जागा शिल्लक राहिलेली नाही. मी जेथे होतो ती अघोर भूमी आहे. आपल्या महाराष्ट्रात राहण्याची इच्छा आहे.

बाबा – तुम्ही सांगा. जी पवित्र जागा वाटेल त्या ठिकाणी रहा.

गोपाळकृष्ण – माझी इच्छा आहे मुळाश्रमात राहण्याची.

बाबा – त्या ठिकाणी नको. मी बच्चा आहे आपला.

गोपाळकृष्ण – मग आपल्या गावी ठेवा. पवित्र जागा आहे ती.

बाबा – आपण स्वयंभू उपासक. तेव्हा इच्छा होती की ऋषिकेश, काशी ही ठिकाणे मागाल. पण तुम्ही तांबडी भूमी मागता.

गोपाळकृष्ण – भूमी तांबडी खरी, पण महान अवतार कार्य झाले आहे त्या ठिकाणी. सत् पुरुष आहेत ना?

बाबा – मग काशीमध्ये राहा. पवित्र ठिकाण आहे. स्वयंभू उपासक तुम्ही. स्वयंभूला मानीत होता ना?

गोपाळकृष्ण – सर्वस्व ठीक आहे. पण मला स्वयंभूने अनुग्रह दिला नाही. आपणाला ज्यानी अनुग्रह दिला, त्यांनीच मला पण दिला. पण मला महाराष्ट्रात त्या ठिकाणी राहता येऊ नये. माझी चूक झाली म्हणून की काय?

बाबा – मग असे करा. राजयोगी गंडवी व त्यांच्या पाच मुली योगिनी त्या ठिकाणी आहेत. वालावल मध्ये तुम्ही बसाल का? चौकट मुनी, सत् पुरुष त्या ठिकाणी आहेत.

गोपाळकृष्ण – मान्य आहे. ती भूमी मला चालेल. त्या ठिकाणी बसण्यास मी तयार आहे.

बाबा – त्या ठिकाणी राहिल्यानंतर परत या ठिकाणी येऊ नये.

गोपाळकृष्ण – आपल्या आदेशाप्रमाणे कोठेही जाणार नाही. (समाप्त) ©️

You cannot copy content of this page