Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तुम्ही पाहता, अनुभवता की इथे लाखो वर्षे तपश्चर्या करणारे ऋषीमुनी सानिध्यात येऊन जातात, सानिध्यात वावरण्याचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरुंचा सेवेकर्‍यावर विश्वास असतो, त्याची परिपूर्णता करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा …

सद्गुरु प्रणवांचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरु प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेकऱ्यांना आपल्या अमृततुल्य बोलांनी समजावून सांगतात. जर सद्गुरूंनी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल, तर …

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

गोपाळ कृष्ण – घोडबंदरचे बाबा ©️

गोपाळ कृष्ण – घोडबंदरचे बाबा ©️

गोपाळ कृष्ण आणि सद्गुरु माऊली (आपले बाबा) यांच्यातील संवाद (साधारण सत्तर ऐंशीच्या दशकातील हा काळ आहे – म्हणजेच सन १९७० ते १९८०)

गोपाळ कृष्ण- ते मला सारे पूर्णत्वाने कळून चुकले आहे. मोठमोठे श्रीमंत हे भगवंताचे भुकेलेले नसतात. ते फक्त मायेचे भुकेलेले असतात. त्याना भगवंत म्हणजे काहीही कळणार नाही. साधीसुधी म्हण आहे, “हात ओला, तर मैतर भला” ज्यावेळी चमत्काराने साध्य होत होते, त्यावेळी जाणे येणे होत होते. त्यांची पात्रता आहे का मला पाहण्याची?

बाबा – तुम्ही ज्योतिष चांगले सांगत होता.

गोपाळकृष्ण – या ज्योतिषामुळेच घसरलो मी.

बाबा – तुम्ही असे प्रणव काढले होते की मी कऱ्हाडी ब्राह्मण आहे.

गोपाळकृष्ण – बोललो होतो, कारण चमत्कार असल्यानंतर अहंकार निर्माण होतो अन् सत् भक्ती पासून दूरावला जातो. सत् भक्ती हि अहंकार, क्रोधरहित आहे. सत् भक्ती लिनता, नम्रता आणि शांती हा त्रिवेणी संगम हवाच हवा, तरच सत् भक्ती हि हृदयात रममाण होते. मी कोणी विशेष आहे असे म्हटल्यानंतर ती सत् भक्तीला बाजूला सारून मजा पाहत असते.

बाबा – मी, बाबाच म्हणणार तुम्हाला. तुम्ही मला प्रेमाने बच्चाच म्हणायचे.

गोपाळकृष्ण – काही म्हणा. डोळस असताना सुद्धा आंधळा झालो अन् म्हणूनच मी आपणाला ओळखले होते. वाटले होते कि आपण माझ्या सानिध्यात रहाल. नाही राहिलात ते फार उत्तम झाले. आपण प्रकाशित होता.

बाबा – कोण म्हणतो?

गोपाळकृष्ण – मी म्हणतो. आपली बुध्दी, आपले विचार श्रेष्ठ व उच्च असल्यामुळे मला आग्रह करता आला नाही. मी बच्चा म्हणालो, त्याची मला क्षमा करा. या जगात कोणीही श्रेष्ठ नाही. प्रकृती भिन्न आहे. सत् तत्व भिन्न नाही. ज्योत सर्व ठिकाणी समान आहे. ©️

You cannot copy content of this page