Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तुम्ही पाहता, अनुभवता की इथे लाखो वर्षे तपश्चर्या करणारे ऋषीमुनी सानिध्यात येऊन जातात, सानिध्यात वावरण्याचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरुंचा सेवेकर्‍यावर विश्वास असतो, त्याची परिपूर्णता करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा …

सद्गुरु प्रणवांचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरु प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेकऱ्यांना आपल्या अमृततुल्य बोलांनी समजावून सांगतात. जर सद्गुरूंनी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल, तर …

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

मऊ मेणाहूनी …©️

मऊ मेणाहूनी …©️

श्री समर्थ मालिक – मऊ मेणाहूनी आम्ही विष्णूदास | कठीण वज्रास भेदू ऐसे | भले तरी देवू कासेची लंगोटी | नाठाळाचे माथी हाणू काठी ||

मऊ मेणाहूनी म्हणजे लोण्यापेक्षाही मऊ असा सेवेकरी, संत तुकाराम याने मऊ होऊनच वज्रापेक्षा कठीण असणाऱ्या तत्वाला म्हणजे प्रकृतीला कष्ट मिळाल्यानंतर भक्ती कठीण आहे असे सांगितले. म्हणून तत्व वज्रापेक्षाही कठीण असले तरी लवचिक कसे होते, कसे करावे हे तुकोबाला माहित होते अन् म्हणून त्याने म्हटले आहे,

मेणापेक्षा मऊ असे ते भक्त, त्या तत्त्वांपाशी मौन धारण करून असतात.तुकोबा जेव्हा जागृतीत दंग होत होते, त्यावेळी त्यांना कठीणता भासत होती का? आताचे सेवेकरी आहेत त्यांना कठीणता भासते.

हे बोल त्यांनी केव्हा काढले? आपल्या तल्लीनतेतून उतरल्यानंतर काढले की आधी काढले याची छाननी करावयास हवी. जैसा अनुभव तैसाच अधिकार, जैसा अधिकार तैसाच अनुभव ! त्याप्रमाणे त्यांने कर्तव्य केले. तुकोबांनी अगोदर हे कशासाठी म्हटले होते अन् का म्हटले होते? कारण ती ज्योत त्या पात्रतेची होती. कितीही त्रास झाला, अडीअडचणी आल्या, पर्वत कोसळले, तरी त्यांचा देह विचलित झाला कां ? तर नाही. आत्ताच्या सेवेकऱ्यांना थोडासा त्रास होऊ द्या, मग बघा तो काय म्हणतो? मग आताचे सेवेकरी मऊ मेणाहूनी मऊ आहेत कां? पण समर्थांचा दृष्टिकोन आहे, तो त्यांनी सोडला आहे का? थोडासा जरी त्रास झाला की, सेवेकऱ्यांची धावपळ होते. चार शब्द वेडेवाकडे बोलून, काखा वर करून, उभा राहण्यास तयार. थोडासा जरी त्रास झाला की, बाबा आम्ही सेवेकरी असे म्हणावयास मागे पुढे पाहत नाही. परंतु सद्गुरुंनी त्या दृष्टीने पाहिले आहे कां? ©️

You cannot copy content of this page