श्री समर्थ मालिक – खरे आहे ! मन मोठे चमत्कारीक आहे. मनाच्या ठिकाणी एक दृष्टी असते, त्यामुळे म्हणतो, मालिक, तुम्हीच सर्वस्व करा. त्याचा तो कुटुंबासहित सुखी असतो. नोकरी तब्येत याबाबत नेहमी तक्रारी असतात.
पूर्वीचे मानव, योगी हे मनाने ठाम होते. आपण ठाम असता कधी? जो मनाने ठाम, तो सतात रममाण होतो. दरबार नंतर समजू लागतो. प्रत्येक सेवेकरी शुद्ध, शांत, सरळ व्हावयास पाहिजे, परंतु तसे ते होत नाहीत. कुठला सेवेकरी झाला आहे कां? मी जास्त किंवा कमी कर्तव्य केले असे सेवेकरी समजतात. परंतु कर्तव्य करून घेणारे निराळे असतात. मी केले असे कधीही म्हणू नये. हे जर समजले, तर मी आपणांपासून दूर नाही.
आदीअंता पासून सद्गुरू, योगी होऊन गेलेत. सतात रममाणही झालेत. जे मायेमध्ये रममाण झालेत, त्यांच्यावर मायेचा कब्जा असतो. आसनाधिस्त सांगतात, त्याप्रमाणे ज्योतीने शुद्ध, सरळ मार्गी होण्याचा प्रयत्न करावा. त्याप्रमाणे अभ्यास करावा.
तत्त्व, नाम, जप हे सर्व निराळे नाही. स्थूल प्रत्यक्ष कर्तव्य करीत असते. अदृश्याच्या कर्तव्याचा अंतपार नाही. सेवेकर्यांनी स्थिर ठाम का होऊ नये?
जोपर्यंत स्थुल आहे, तोपर्यंत गतिमान व्हा ! नंतर मी जाणतो काय करावयाचे ते? गतिमान व्हा ! सर्वस्व करून घेतले जाईल. त्याप्रमाणे करूनही घेतात. आपल्या संचितात असत भर घालू नका. संचितामध्ये हेवा दावा घडवू नये असे संदेश आहेत. प्रत्येकामध्ये सुधारणा झाली पाहिजे. कर्तव्यात रहा. मग ते जवळच आहेत. एक वेळ चुकेल, त्या चुकीस क्षमा आहे. परंतु परत परत करण्यात येणाऱ्या चुकीस क्षमा करावी का? क्षमा मागण्यास ना अंत ना पार. आपणच सुधारल्यानंतर क्षमा मागण्याची काय आवश्यकता असते? जाणून बुजून चुकावयाचे नाही. सानिध्यात असताना अभ्यास करावा. मग क्षमा मागण्याची आवश्यकता नाही. चुकू लागल्यानंतर मग क्षमेला अर्थ नाही. (समाप्त)©️
