Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – मालिक वैकुंठी नाहीत. योगीयांच्या हृदयी नाहीत, तर मग मी कोठे असतो? तर मी सत् भक्तांच्या ठिकाणी असतो. तेथेच …

निश्चयाचे बळ – २ ©️

निश्चयाचे बळ – २ ©️

पूर्वजन्मीच्या संचिताप्रमाणे जी ज्योत प्रथम सत् भक्तीने जाण्याचा प्रयत्न करते. त्या सत् भक्तीने जाणाऱ्या किंवा मार्ग आक्रमण करीत असणाऱ्या ज्योतीला अनुभव येतात. तद्नंतर पुढे त्याला त्रास जरी झाला, तरी पूर्वीच्या अनुभवामुळे सत् भक्तीच्या प्रकाशाला तो विसरत नाही. कारण जे पाहिले नाही ते त्याला पहावयास मिळते. सत् भक्तीच्या प्रकाशात तो डुंबत असतो. त्याचा निश्चय ठाम असतो. त्याच्या निश्चयाच्या बळाचे वर्णन इतर मानवांना करता येणार नाही. इतर मानवांना त्याची शक्ती आजमावता येणार नाही. मानव म्हणतात हा वेडा आहे. त्याच्या संगतीत राहून उपयोग नाही. पण त्याचे जे बळ असते, त्याची खूणगाठ त्याने बांधलेली असते. त्याने निश्चयाच्या बळाची शक्ती वाढवलेली असते. ती कोणालाही तोडता येणार नाही. नंतर अडीअडचणीतून त्याचा कस घेतला जातो. त्या कसात उतरल्यानंतर त्याचे फळ त्याला मिळते. मग समर्थ त्याला अनवाणी पाठविणार नाहीत. त्याच्यावर पूर्ण लक्ष असते. कारण त्याचा निश्चय, बळ त्यांने कमावलेले असते. प्रकृतीच्या त्रासाला तो महत्त्व देत नाही. त्याने आपले बळ पूर्णत्वाने वाढविलेले असते. म्हणून त्याला त्याचे कर्तव्याचे फळ देऊन मोकळे होतात. म्हणून सत् भक्तीने प्रकाश की सत् भक्तीचा प्रकाश ! हा प्रकाश सत् भक्तीने मिळतो. नाही पेक्षा मानवाचे मनाची भावना अनेक असते. जगात देव आहे असे म्हणतात, पण भक्ती कशी करावी समजत नाही. मनाची भावना ज्याप्रमाणे, त्याप्रमाणे त्याला प्रकाश मिळतो.

भक्ती कोणाचीही करा, त्याप्रमाणे त्याला गती दिली जाते. पण सत् भक्तीची गती न्यारी असते. पण अवूर गतीने जाणारे मानव चमत्कार लवकर करतात. पण सत भक्ती रममाण होणे दुर्लभ आहे. तितकेच ते सोपेही आहे. पण कसे? निश्चयाचे बळ, पूर्ण ठाम श्रद्धा, याप्रमाणे राहिल्यानंतर त्याची कुणीही काही करू शकत नाही. अशाच मार्गाने, सत् भक्तीच्या प्रकाशाने सेवेकर्‍यांनी जाणे हे संदेश आहेत. सेवेकर्‍यांनी निश्चयाचे बळ वाढविण्याचा प्रयत्न करावा. त्याने बळ जर वाढविले तर तो या आसनाजवळ ओरडत येणार नाही. गाऱ्हाणी आणणार नाही. श्रद्धेन सर्वे वश: हे सेवेकर्‍यांनी लक्षात ठेवावे. (समाप्त) ©️

You cannot copy content of this page